Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वारंगा फाटा बस स्थानक

वारंगा फाटा बस स्थानकाला आले तळ्याचे स्वरुप

Waranga Phata Bus Station: वारंगा फाट्यातील बस स्थानकाला पाणी आल्याने परिसरात चिखलमय असून पावसाळ्याच्या वेळी रस्त्यावर जाणारे खाजगी वाहने येथून टळत आहेत.


वारंगा फाटा बस स्थानकाला आले तळ्याचे स्वरुप

Waranga Phata Bus Station |

 

प्रवासी वळले खाजगी वाहतूकीकडे

वारंगा फाटा (Waranga Phata Bus Station) : येथील बस स्थानकाला तळ्याचे स्वरुप आल्याने परिसर चिखलमय झाला आहे. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असुन   चिखलातून मार्ग काढण्या पेक्षा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

वारंगा फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व 161 आशा महामार्ग जोडणारे ञि रस्ता संगम आहे. येथून पुणे पंढरपूर, नागपूर, अकोला, सोलापूर ,कोल्हापूर, हैदराबाद गोंदिया, गडचिरोली, अमरावती आशा लांब पल्ल्याच्या बस धावतात. वारंगा फाटा येथे महामंडळाने बांधलेले प्रशस्त बस स्थानक आहे. येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी असते हे बस स्थानक राष्ट्रीय महामार्गापेक्षा खोलगट जागेत आहे. त्यामुळे पावसाळा आला की. या बस स्थानकात एक दीड फूट पाण्यातून व चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.

 पाण्यातून व चिखलातून जाण्यापेक्षा राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स काळी पिवळी, ऑटो व इतर प्रवासी वाहनाने प्रवास करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे परिवहन महामंडळाचे नुकसान होत आहे.  याची वरिष्ठाने दखल घेऊन या बस स्थानकात भर घालून पाण्याची विल्हेवाट  लावावी. लोकप्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधी यांनी लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रवाशांचे हाल थांबवावे अशी  मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.