Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

Vishwas Nangare PatilVishwas Nangare Patil

RSS कार्यक्रमातील उपस्थितीवर विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण; 'सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या टीकेला नव्याने नियुक्त झालेले नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उत्तर दिले आहे.


rss कार्यक्रमातील उपस्थितीवर विश्वास नांगरे पाटील यांचे स्पष्टीकरण सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन केले नाही

Vishwas Nangare Patil |

नागपूर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजकीय टीकेला दिले उत्तर; संविधानाशी कटिबद्ध असल्याची ग्वाही

नागपूर (Vishwas Nangare Patil) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या टीकेला नव्याने नियुक्त झालेले नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उत्तर दिले आहे. संबंधित कार्यक्रमात सहभागी होऊन आपण कोणत्याही सेवा नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली.

कार्यभार स्वीकारल्यानंतर नांगरे पाटील म्हणाले की, नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात प्रथमच काम करण्याची संधी मिळत असून मुख्यमंत्री यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही जबाबदारी अधिक मोठी आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे, प्रभावी पोलिसिंग करणे तसेच महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पोलिस दलाचे ध्येय लोकसेवा असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, आमच्या खांद्यावरील IPS मधील 'S' म्हणजे Service. त्यामुळे पोलिसांची भीती सामान्य नागरिकांना नव्हे, तर केवळ गुन्हेगारांनाच वाटली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.

RSS कार्यक्रमातील उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना नांगरे पाटील यांनी सांगितले की, आपण पोलिस अधिकारी म्हणून पूर्णपणे भारतीय संविधान आणि त्याच्या मूल्यांशी बांधील आहोत. नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीची भूमी असून त्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव आहे. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही सामान्य बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ज्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला जात आहे तो १९ एप्रिल रोजी सानपाडा येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी निमंत्रण दिले होते आणि त्यात अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात जीएसटीसंदर्भात मार्गदर्शन, आध्यात्मिक विषयांवरील व्याख्याने तसेच विविध विषयांवर चर्चा झाली होती.

गेल्या ३० वर्षांपासून पोलिस सेवेत कार्यरत असल्याचे सांगत नांगरे पाटील म्हणाले की, आपण रमजान ईद, जैन आणि शीख समाजाच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहतो. त्याच परंपरेचा भाग म्हणून या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. त्या ठिकाणी आपण मानवी कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना, ज्ञानेश्वरीतील प्रार्थना, अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुणांवर होणारे परिणाम आणि पोलिस दलातील करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्यामुळे आपल्या उपस्थितीत कोणत्याही सेवा शर्तींचा भंग झालेला नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

हा कार्यक्रम वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षांच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होणे हे नियमबाह्य नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंची टीका

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या RSS कार्यक्रमातील सहभागावर टीका केली होती. एका आयपीएस अधिकाऱ्याची निष्ठा केवळ पोलिस दलाच्या कर्तव्याशी असली पाहिजे, असे सांगत त्यांनी नांगरे पाटील यांच्यावर दुहेरी निष्ठा दाखवल्याचा आरोप केला होता. संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल तर पोलिस सेवेचा राजीनामा देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा, असा सल्लाही राज ठाकरे यांनी सार्वजनिकरित्या दिला होता.

Related to this topic: