Breaking News
  • अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी
  • समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प
  • सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल
  • पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  • पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग
  • अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द!
  • शेतीत काम करणारी 'महिला' आता 'शेतकरी': आ. श्वेता महाले पाटील
  • E20: 'सरकारचे प्रयोग, जनतेची परीक्षा?'

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Vice Chair

बुलढाण्याच्या सुपुत्राची जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी

रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत कार्यरत असलेली रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिप (RMB) ही अधिकृत जागतिक फेलोशिप असून जगभरातील अनेक देशांमध्ये तिची शेकडो चॅप्टर्स कार्यरत आहेत.


बुलढाण्याच्या सुपुत्राची जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी

Vice Chair |

रोटे. डॉ. अशोक शर्मा यांची RMB इंटरनॅशनलच्या व्हाईस चेअरपदी एकमताने निवड

चिखली (Vice Chair) : बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, ठाण्यातील प्रख्यात वास्तुविशारद, स्ट्रक्चरल इंजिनिअर, उद्योजक आणि रोटेरियन रोटे. डॉ. अशोक शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी करत रोटरी क्षेत्रात महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे अमिगोज (रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२) चे सदस्य आणि रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिप (RMB) ठाणे सिटी चे चार्टर चेअरमन असलेल्या डॉ. शर्मा यांची रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिप (RMB) इंटरनॅशनलच्या डायरेक्टर – आशिया पदावर २०२६–२०२८ या कार्यकाळासाठी सर्वाधिक मतांनी निवड झाली आहे.

रोटरी इंटरनॅशनल अंतर्गत कार्यरत असलेली रोटरी मीन्स बिझनेस फेलोशिप (RMB) ही अधिकृत जागतिक फेलोशिप असून जगभरातील अनेक देशांमध्ये तिची शेकडो चॅप्टर्स कार्यरत आहेत. व्यावसायिक नेटवर्किंग, उद्योग-व्यवसायातील सहकार्य आणि 'Service Above Self' या रोटरीच्या तत्त्वाला अधिक बळकटी देणे हे या फेलोशिपचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

डायरेक्टर – आशिया म्हणून निवड झाल्यानंतर २ जुलै २०२६ रोजी झालेल्या RMB इंटरनॅशनलच्या पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. अशोक शर्मा यांची २०२६–२०२७ या वर्षासाठी व्हाईस चेअर (Vice Chair) म्हणून एकमताने (Unanimously) निवड करण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ मधून RMB इंटरनॅशनलच्या संचालक मंडळावर निवड होणारे आणि व्हाईस चेअरपद भूषविणारे ते पहिलेच रोटेरियन ठरले असून, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

RMB इंटरनॅशनलच्या ११ सदस्यीय आंतरराष्ट्रीय संचालक मंडळात रोटे. अरविंद बत्रा (भारत) चेअरमन, रोटे. डॉ. अशोक शर्मा (भारत) व्हाईस चेअर, रॉबर्ट स्टाइमझर (युरोप) सचिव, सुनील शर्मा (कॅनडा) कोषाध्यक्ष, मार्गारेट (आफ्रिका), आंद्रे एल. अॅडम्स (उत्तर अमेरिका), ब्रँट हासनन (अमेरिका), राजामोहन दांडपाणी (आशिया), महेश सप्तर्षी (आशिया) तसेच मार्क ब्रुचिल हे संस्थापक चेअर (Founder Chair) म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. अशोक शर्मा यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बुलढाणा येथे झाले. त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच त्याच विषयात डॉक्टरेट प्राप्त केली. २०१७ मध्ये व्यवसाय विस्तारासाठी त्यांनी ठाण्यात स्थलांतर केले.

ते Homes for India Private Limited या आर्किटेक्चर, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, इंटिरिअर डिझाईन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि मॉड्युलर फर्निचर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Founder & CEO) आहेत. जवळपास ३० वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी देश-विदेशातील २,००० हून अधिक प्रकल्पांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.

२०१८ पासून रोटरीशी संलग्न असलेल्या डॉ. शर्मा यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे अमिगोजचे सचिव (२०१९–२०), चार्टर अध्यक्ष, RMB ठाणे सिटीचे चार्टर चेअरमन, मेंबरशिप अव्हेन्यू चेअरमन अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सध्या ते रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२चे मेंबरशिप चेअरमन तसेच असिस्टंट गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. अशोक शर्मा यांच्या या दुहेरी आंतरराष्ट्रीय निवडीमुळे बुलढाणा जिल्हा, ठाणे शहर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ आणि संपूर्ण भारताचा जागतिक रोटरी परिवारातील गौरव उंचावला असून, विविध सामाजिक, औद्योगिक आणि रोटरी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: