Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी जोरदार पाऊस

कळमनुरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर, नागरिकांची तारांबळ

Kalamnuri Heavy Rain: कळमनुरीत अचानक जोरदार पावसाने रस्त्यावर घाणपाणीच्या समस्ये पसरली आहेत. या कारणामुळे शहरातील नाल्यांची सफाई व पाणी निचऱ्याची व्यवस्था केल्याबाबत नागरिकांना संशय आहे.


कळमनुरीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर नागरिकांची तारांबळ

Kalamnuri Heavy Rain |

कळमनुरी (Kalamnuri Heavy Rain) : शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अल्पावधीत झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर आले असून, नागरिकांना या सांडपाण्यातून रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्वच्छता व पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्याची गरज असताना नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (Kalamnuri Heavy Rain) रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून, आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

"अचानक पाऊस आला की दरवेळी हीच परिस्थिती निर्माण होते, मग नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष का देत नाही?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील नाल्यांची तातडीने साफसफाई करून पाणी निचरा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related to this topic: