Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शेलगाव जहांगीर प्रकरण

शेलगाव जहांगीर प्रकरणानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडून जखमी महिलेची भेट

Shelgaon Jahangir Case: चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट


शेलगाव जहांगीर प्रकरणानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडून जखमी महिलेची भेट

Shelgaon Jahangir Case |

चिखली (Shelgaon Jahangir Case) : चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. संबंधित प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनेनंतर दलित पँथरचे नेते दीपक केदार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली.

त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्या ॲड. शर्वरी तुपकर, विनायक सरनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत जखमी महिलेची विचारपूस केली आणि कुटुंबाला धीर दिला. व आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, जखमी महिलेची मुलगी प्रतीक्षा साळवे हिने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध करून आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या (Shelgaon Jahangir Case) प्रकरणात आपली भूमिका मांडत संबंधित व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रदीप मुरलीधर पाटील करीत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून, वस्तुस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Related to this topic: