Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी अपघाती मृत्यू

परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Parbhani Accidental Death: मानवत तालुक्यातील रूढी शिवारात  केशव जिनिंग समोर  अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेलंगणा राज्यातील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना


परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

Parbhani Accidental Death |

 

परभणीच्या रुढी शिवारातील घटना; मयत तेलंगणा राज्यातील रहिवासी

परभणी (Parbhani Accidental Death) : मानवत तालुक्यातील रूढी शिवारात  केशव जिनिंग समोर  अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेलंगणा राज्यातील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ४ जुलै रोजी सायंकाळी ७:४५ वाजता घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, तेलंगणा राज्यातील  कर्नुल जिल्ह्यातील  आदोनी  येथील चालक शेख अल्ताफ आणि क्लिनर  शेख अनवर शेख बाबा  हे दोघे  ट्रक क्रमांक ए.पी ०२ टी ई १२६९ ट्रक घेऊन केशव जिनींग मध्ये गठन भरून नेण्यासाठी शुक्रवार ३ जुलै रोजी आले होते. शनिवार ४ जुलै रोजी गठन लोड करून निघण्याच्या तयारीत होते.

थोडा वेळ असल्याने  क्लीनर  शेख अन्वर शेख बाबा हे जिनिंगच्या बाहेर  मानवत  -परभणी रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी आले असताना अज्ञात वाहनाने  जोराची धडक दिल्याने  या युवकाचा जागीच मृत्यू झाला. (Parbhani Accidental Death) धडक दिल्यानंतर वाहन घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे कोणत्या वाहनाने धडक दिली याची माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोउपनी अनिल खिल्लारे, वाशिष्ट बिक्कड, किशन पतंगे, चालक गायत्री लोखंडे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related to this topic: