Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

“हैदराबादहून गावाकडे निघाला... पण मृत्यूने वाटेतच गाठलं!”

उदगीर-बीदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री बामणी पाटी जवळ झालेल्या भीषण अपघातात नळगीर येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.


“हैदराबादहून गावाकडे निघाला पण मृत्यूने वाटेतच गाठलं”

Udgir Accident |

उदगीर-बीदर महामार्गावर भीषण अपघात; नळगीरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर (Udgir Accident) : उदगीर-बीदर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री बामणी पाटी जवळ झालेल्या भीषण अपघातात नळगीर येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश उमाकांत थोटे (वय २४, रा. नळगीर) हा कामानिमित्त हैदराबाद येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी सुट्टी असल्याने तो आपल्या कारने गावाकडे परतत होता. दरम्यान, बामणी पाटी परिसरात उदगीरकडून बीदरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्याच्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दिनेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला.

दिनेश हा मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून ओळखला जात होता. काही महिन्यांपूर्वीच त्याला हैदराबादमधील खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. नव्या आयुष्याची स्वप्ने उराशी बाळगून निघालेल्या या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नळगीर गावावर शोककळा पसरली आहे.

रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नळगीर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related to this topic: