Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

नांदेड मन्नेरवारलू समाज

मन्नेरवारलू समाजापुढील संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा

Nanded Mannerwarlu Samaj: नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड आणि देगलूर तालुक्यात राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाने ‘समाज संपर्क दौरा’ आयोजित केला. या दौऱ्यात मन्नेरवारलू समाज


मन्नेरवारलू समाजापुढील संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा

Nanded Mannerwarlu Samaj |

 

राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचे समाज बांधवांना आवाहन
कंधार, मुखेड आणि देगलूर तालुक्यात ‘समाज संपर्क दौरा’

नांदेड (Nanded Mannerwarlu Samaj ) : मन्नेरवारलू समाजावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी संघटित होऊन मोठ्या संघर्षासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. महासंघाच्या वतीने नुकताच नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड आणि देगलूर तालुक्यात धडक 'समाज संपर्क दौरा' आयोजित करण्यात आला होता, या दौऱ्या दरम्यान विविध ठिकाणी सभा घेऊन (Nanded Mannerwarlu Samaj) समाज जागृतीवर विशेष भर देण्यात आला.

शनिवार, २३ मे रोजी महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंधार मधूल बहादरपुरा,मुखेड मधील जांब बु. आणि देगलूर येथे भेटी देऊन समाज बांधवांशी थेट संवाद साधण्यात आला.दौऱ्याची सुरुवात सकाळी बहादरपुरा येथून झाली. येथे समाजातील प्रमुख नागरिकांची महत्त्वाची सभा पार पडली. या सभेत सध्याच्या घडीला (Nanded Mannerwarlu Samaj) मन्नेरवारलू समाजावर होत असलेल्या विविध अन्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली."भविष्यात समाजावर आरक्षणा संदर्भात आणि अस्तित्वा संदर्भात मोठ्या संकटांची सुनामी येणार असून, ती रोखण्यासाठी आताच जागे होण्याची गरज आहे," अशी भीती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर जांब बु.येथे झालेल्या सभेत बोलताना, समाजावर येत असलेल्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी तरुणांनी आणि सर्व समाज बांधवांनी सदैव तत्पर व सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात देगलूर येथे सभा झाली. या ठिकाणी आपल्या हक्कांवर कसा गदा आणली जात आहे आणि मन्नेरवारलू समाज सध्या किती मोठ्या धोक्यात आहे, हे उदाहरणांसह पटवून देण्यात आले. तसेच यापुढील काळात हक्काच्या लढाईसाठी तीव्र संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

या संपर्क दौऱ्या दरम्यान समाजाचे प्रलंबित आणि गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाच्या वतीने  मन्नेरवारलू समाजातील व्यक्तींना दिली जाणारी जाचक 'कंडिशनल व्हॅलिडिटी' (सशर्त वैधता प्रमाणपत्र) देण्याची पद्धत तात्काळ बंद करण्यात यावी, ज्या व्यक्तींना आधीच कंडिशनल व्हॅलिडिटी मिळालेली आहे, त्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांची जात पडताळणी करताना केली जाणारी पुनरतपासणी पूर्णपणे थांबवण्यात यावी,वैद्यकीय (मेडिकल) क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या समाजाच्या ६६ विद्यार्थ्यांना न्यायालयातून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी महासंघ संपूर्ण ताकदीने कायदेशीर लढाई लढणार, 'उमरजे प्रकरणात' सर्वोच्च न्यायालयात  इंटरफर (हस्तक्षेप याचिका) दाखल करून समाजाला न्याय मिळवून देणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले.

या संपूर्ण दौऱ्यात (Nanded Mannerwarlu Samaj) राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मण ठक्करवाड, उपाध्यक्ष मारोती कंठेवाड, सचिव सुरेश अंबुलगेकर, कोषाध्यक्ष नामदेव मिठेवाड, महासंघाचे संचालक दिलीप बस्टेवाड, बाबुराव पुजारवाड, शिवराम बोधगीरे, बालाजी इंगेवाड, गंगाधर गिरोड आणि महासंघाचे कायदे सल्लागार ॲड. सुधीर राऊतवाड प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व सभांचे यशस्वी सूत्रसंचालन महासंघाचे संचालक गंगाधर गिरोड यांनी केले. या दौऱ्यामुळे जिल्ह्यात मन्नेरवारलू समाजात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असून, आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरवली जाणार असल्याचे समजते.

Related to this topic: