Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मुंबई

Tiranga March

NEET आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा; राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी मुंबईत तिरंगा मोर्चाचे आयोजन केले आहे.


neet आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूंचा तिरंगा मोर्चा राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Tiranga March |

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकपर्यंत मोर्चा; शरद पवार यांचाही पाठिंबा

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी मुंबईत तिरंगा मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत निघणाऱ्या या मोर्चाला कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत. या मोर्चाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

तिरंगा मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी शनिवारी शिवतीर्थ या निवासस्थानी शहराध्यक्ष, विभागप्रमुख आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, २६ जुलै रोजी होणारा हा मोर्चा नीट परीक्षेतील गोंधळ, विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावर सरकारने केलेल्या कारवाईचा निषेध आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आयोजित करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय उद्देशाने नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्नासाठी आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊ न शकणाऱ्या नागरिकांनी या तिरंगा मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पक्षनेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

देशभरातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा आहे, हा संदेश देणे हा या मोर्चाचा मुख्य हेतू असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मोर्चाचे निमंत्रक आपण आणि उद्धव ठाकरे असलो तरी आपल्या नावानेही घोषणा दिल्या जाऊ नयेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मोर्चात गर्दीचा गैरफायदा घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्यांनी कठोर शब्दांत इशारा दिला. चुकीच्या घोषणा देणे, गोंधळ घालणे किंवा विशेषतः विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना कठोरपणे रोखले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करताना विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले. तसेच मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. रविवारी सकाळी १० वाजता शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमावे आणि शांततापूर्ण मार्गाने केंद्र सरकारपर्यंत जनतेचा संताप पोहोचवावा, असा निर्धार ठाकरे बंधूंनी व्यक्त केला आहे.

 

Related to this topic: