Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास गेलेल्या चार महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने हादरला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास गेलेल्या चार महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

Tiger Attack |

जंगलात तेंदूपत्ता तोडताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला; परिसरात दहशतीचे वातावरण

चंद्रपूर, सावली (Tiger Attack) : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने हादरला आहे. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली.

मृतकांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) या महिलांचा समावेश आहे. वाघाने अचानक हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना असून, या हिंस्त्र हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जंगलाचा आसरा आणि हिंस्त्र प्राण्याचा वेग यामुळे महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले.

घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: