Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर

Threat Allegation

'मोदींना संविधानापेक्षा मोठं केल्याने देशाचं नुकसान'; अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली.


मोदींना संविधानापेक्षा मोठं केल्याने देशाचं नुकसान अभिजीत दीपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

भाजपमध्ये येण्यासाठी ऑफर व धमक्या आल्याचा दावा; संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत मोदी, अमित शहा आणि केंद्र सरकारवर टीका

संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. देशात एखाद्या व्यक्तीला संविधानापेक्षा मोठे स्थान दिल्यामुळे लोकशाहीच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दीपके यांनी दावा केला की, भाजपकडून त्यांना पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक वेळा ऑफर देण्यात आल्या. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "भाजपमध्ये जायचे असते तर आतापर्यंत केव्हाच गेलो असतो," असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, आंदोलन मागे घ्यावे आणि भाजपमध्ये सहभागी व्हावे, अन्यथा गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तसेच त्यांच्या आई-वडिलांनाही लक्ष्य करून धमकावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. "तुझ्या घरी येऊन आई-वडिलांना पाहून घेऊ," अशा प्रकारचे संदेश आणि धमक्या मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दीपके म्हणाले की, "मी अवघा ३० वर्षांचा असून तुमच्या नातवाच्या वयाचा आहे. अशा वयाच्या तरुणाला धमक्या देणे योग्य आहे का, याचा विचार करा. अशा प्रकारची भाषा वापरणे लाजिरवाणे आहे."

भविष्यात 'झेनझी' हा चेहरा राजकारणात सक्रिय होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता दीपके यांनी त्यावर सावध भूमिका घेतली. "एका व्यक्तीला अवाजवी मोठे करण्याची प्रवृत्ती देशासाठी घातक ठरली आहे. २०१४ नंतर आपण एका व्यक्तीला संविधान आणि देशापेक्षाही मोठे स्थान दिले. त्यामुळे बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि सरकारी रुग्णालयांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. माध्यमांनी दिवसभर एका व्यक्तीभोवती चर्चा करण्याऐवजी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे," असे त्यांनी म्हटले.

Related to this topic: