Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची पोथ लांबवली; पोलिसांच्या तत्परतेने महिला ताब्यात

संतनगरी शेगाव बसस्थानकावर गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमला एकादशी आणि गुरुवार असल्याने भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.


शेगाव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेची पोथ लांबवली पोलिसांच्या तत्परतेने महिला ताब्यात

Theft Incident |

शेगाव (Theft Incident) : संतनगरी शेगाव बसस्थानकावर गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमला एकादशी आणि गुरुवार असल्याने भाविक व प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोथ चोरी झाल्याची घटना घडली. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे संशयित महिलेला ताब्यात घेण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकावरील एका फलाटावर परतवाडा–छत्रपती संभाजीनगर ही बस उभी होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडाली होती. काही क्षणांतच बसमध्ये पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. प्रचंड गर्दी आणि उकाड्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच एका वृद्ध महिलेला आपल्या गळ्यातील पोथ गायब झाल्याचे लक्षात आले.

पोथ चोरीला गेल्याचे समजताच संबंधित महिला धाय मोकलून रडू लागली. त्यामुळे बसमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बसस्थानकावरील पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांसह संबंधित बस थेट पोलिस ठाण्यात नेली.

पोलिस ठाण्यात सर्व प्रवाशांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी एका ३२ वर्षीय महिलेने वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोथ चोरी केल्याचे उघड झाले. त्यानंतर फिर्यादी वृद्ध महिला आणि संशयित महिलेला पुढील चौकशीसाठी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. दरम्यान, उर्वरित प्रवाशांना पुन्हा बसमध्ये बसवून संबंधित बस मार्गस्थ करण्यात आली.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेची पोथ चोरी करणारी महिला ताब्यात घेण्यात यश आले. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू होती.

विशेष म्हणजे, बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईल फोनवर डल्ला मारत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

Related to this topic: