Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

युवतीचा दुर्दैवी मृत्यू

नदीतील खड्ड्यात पडुन युवतीचा दुर्दैवी मृत्यू

Young Girl Death: वसमत तालुक्यातील सोन्ना येथे १७ वर्षीय युवती अस्मिता जाधव नदीत कपडे धुण्यासाठी गेले. तिच्या कपड्यांचे धुण्यासाठी नदीत पाण्याचा अंदाज न लागल्याने तिला पाण्यात खड्ड्यात पडून मृत्यू


नदीतील खड्ड्यात पडुन युवतीचा दुर्दैवी मृत्यू

Young Girl Death |

 

वसमत तालुक्यातील सोन्ना येथील घटना

हट्टा (Young Girl Death) : वसमत तालुक्यातील सोन्ना येथील नदीमध्ये कपडे धूण्याकरीता आलेल्या युवतीचाd रेती उपसा केलेल्या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील  सोन्ना येथील युवती २७ मे बुधवार रोजी सकाळच्या सुमारास अस्मिता गजानन जाधव (१७) ही नदीमध्ये कपडे धुण्याकरीता आली होती.  यावेळी तिच्यासोबत अन्य काही महिला देखील होत्या. या प्रसंगी अस्मिता ही नदीच्या पात्रात कपडे धुण्याच्या नादामध्ये तिला पाण्याचा अंदाज लागला नाही.

रेती उपसा केलेल्या खड्ड्यात पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही (Young Girl Death) दुर्देवी वार्ता गावामध्ये कळताच अनेकांनी नदीकडे धाव घेतली. त्यानंतर तिला तात्काळ नदी पात्रातून हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता डॉक्टरांनी तपासुन तिला मृत घोषित केले. मयत अस्मिता जाधव हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. शमशोद्दिन सिद्दिक यांनी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुहे हळहळ व्यक्त होत आहे.

मामाच्या गावी शिकत होती युवती

अस्मिता जाधव ही वसमत तालुक्यातील कोनाथा येथे मामाच्या गावी शिकण्याकरीता राहत होती. दहावीची परीक्षा झाल्यानंतर ती नुकतीच उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे उन्हाळी सुट्यात आपल्या गावी आली होती. याच दरम्यान नदीच्या पात्रात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू (Young Girl Death) झाल्याने सोन्ना व कोनाथा येथे हळहळ व्यक्त होत आहे.