Breaking News
  • परभणीतील हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळला, 30-40 जण दबल्याची माहिती
  • परळीत दिवसाढवळ्या अपहरण ऊसतोडणीच्या'उचल' पैशांवरून तरुणाला गाडीत टाकून पळवले
  • एकही खासदार कुठंही जाणार नाही, शिंदेगटाच्या नेत्याच्या दावा
  • पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे
  • मान्सूनच्या विलंबामुळे मराठवाड्यात खरीप पेरण्या रखडल्या; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
  • छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेला परिसरातील पुंडलिकनगर येथील महारुद्र हनुमान मंदिराजवळ आज पहाटे दोन मजली बिल्डिंगमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.
  • सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे विहीरीत टेम्पो कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 40 चाळीस लाख रूपयांची मदत देण्यात आली.
  • डी.आर.डी.ओचे डॉ प्रदीप कुरुलकरवर आरोप निश्चित, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग अखेर मोकळा
  • छत्रपती संभाजी नगर येथील ATS पथकांच्या १५ टीम कडून विविध भागात धाडी

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

नागपूर मध्ये जादूमहल चौकात अल्पवयीन टोळीचा रक्तरंजित हल्ला, २२ वर्षीय तरुणाची हत्या

अजनी परिसरातील जादूमहल चौकात मंगळवारी रात्री घडलेल्या चाकू हल्ल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


नागपूर मध्ये जादूमहल चौकात अल्पवयीन टोळीचा रक्तरंजित हल्ला २२ वर्षीय तरुणाची हत्या

Teen Violence |

नागपूर (Teen Violence) : अजनी परिसरातील जादूमहल चौकात मंगळवारी रात्री घडलेल्या चाकू हल्ल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या वैरातून २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून त्याचा मित्र गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व संशयित आरोपी हे अल्पवयीन असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मृत झालेल्या तरुणाचे नाव सागर गिरीधर सलामे (वय २२) असे आहे. तो भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून आठवडी बाजारात मेहनत करून आपल्या कुटुंबाला आधार देत होता. त्याच्यासोबत जखमी झालेला त्याचा मित्र हर्षल उर्फ एलेक्स शिंदे याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर आणि एका अल्पवयीन मुलामध्ये सुमारे दहा दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्याच्या उद्देशातून आरोपींनी सागरचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी महाप्रसाद कार्यक्रमाच्या नावाखाली सागरला फोन करून जादूमहल चौकात बोलावण्यात आले. सागर आणि त्याचा मित्र घटनास्थळी पोहोचताच, पूर्वनियोजन करून लपून बसलेल्या १० ते १२ अल्पवयीन मुलांच्या गटाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी हातात असलेल्या लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी दोघांनाही जबर मारहाण केली.

हल्ला सुरू असताना सागरने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग सोडला नाही. नंदिनी मेडिकल स्टोअरजवळ त्याला गाठून धारदार चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमांमुळे तो घटनास्थळीच कोसळला. त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, त्याचा मित्र हर्षल देखील गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचवत पळत सुटला आणि सक्करदारा तलाव परिसरात कोसळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तपासादरम्यान पोलिसांना अधिक धक्कादायक माहिती मिळाली असून या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीने खुनाचा कट आधीच आखत ऑनलाइन पद्धतीने धारदार चाकू मागवला होता, असे समोर आले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने हा संपूर्ण हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट होत आहे.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी अवघा १७ वर्षांचा असून त्याच्यासोबत १४ वर्षांचा आणखी एक अल्पवयीन मुलगाही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. १० ते १२ जणांच्या टोळीने हा हल्ला केल्याने पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे शहरात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी, सोशल मीडियाचा प्रभाव आणि टोळक्यांमधील सूडभावना यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अजनी पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन चंद्र राजकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related to this topic: