Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

तहसीलदार सागर नन्नवरे

प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे यांच्याकडे वसमतच्या तहसीलदार पदाचा पदभार

Tehsildar Sagar Nannaware: वसमत तहसीलदार पदावर निलंबित झालेले पद रिक्त झाल्यावर प्रशिक्षणात असलेल्या उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली


प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे यांच्याकडे वसमतच्या तहसीलदार पदाचा पदभार

Tehsildar Sagar Nannaware |

वसमत (Tehsildar Sagar Nannaware) : वसमत तहसीलदार पदाचा पदभार पर्यवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी सागर सुभाष नन्नवरे यांनी सोमवारी स्वीकारला आहे त्यांची वसमत तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रशिक्षण कालावधीत सहा आठवड्यासाठी ते वसमचे तहसीलदार म्हणून कारभार पाहणार आहेत वसमत येथे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा महसूल विभागाचेअधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

वसमत येथील वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी या अवैध गौण खनिज प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यामुळे वसमतचे तहसीलदार पद रिक्त झाले होते रिक्त असलेल्या तहसीलदार पदावर  तहसीलदार म्हणून लातूर येथून प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी सागर सुभाष नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे 18 मे रोजी त्यांनी रीतसर प्रभार स्वीकारला आहे.

पर्यवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते लातूर जिल्ह्यात रुजू आहेत प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांची तहसीलदार (Tehsildar Sagar Nannaware) म्हणून वसमत येथे नियुक्ती करण्यात आली आहे सहा आठवड्यासाठी ते वसमतचे तहसीलदार म्हणून कारभार पाहणार आहेत  वसमतच्या इतिहासात पहिल्यांदाच तहसीलदार असताना निलंबित होण्याचा मान तहसीलदार शारदा दळवी यांनी मिळवला आहे त्यामुळे वसमत वसूल विभागाचे प्रचंड बदनामी झालेली आहे त्यांच्या काळात खाजगी इसमांच्या  माध्यमातून तहसीलच्या कारभारात कारभारात हस्तक्षेप व्हायचा ड्रायव्हरच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवले जायचे या सर्व प्रकारावर नवनियुक्त तहसीलदार सागर नन्नवरे त्यांना नियंत्रण मिळवावे लागणार आहे तरुण तडफदार अधिकारी म्हणून ते वसमत महसूल प्रशासनावर छाप पडतील वसमत चा नावलौकिक पुन्हा मिळवून देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे.