Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

कालावधी संपल्यानंतरही गंगाखेड तालुक्यात ठाण मांडलेल्या तलाठ्यांची बदली होणार का?

गंगाखेड तालुक्यात एकाच ठिकाणी तसेच तालुक्यातील निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतरही वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


कालावधी संपल्यानंतरही गंगाखेड तालुक्यात ठाण मांडलेल्या तलाठ्यांची बदली होणार का

Talathi Transfer |

मलईदार सज्जांसाठी स्पर्धा; बदली प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष

परभणी (Talathi Transfer) : गंगाखेड तालुक्यात एकाच ठिकाणी तसेच तालुक्यातील निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतरही वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महसूल विभागातील गट ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर गंगाखेडमधील विविध तलाठी सज्जांसाठी स्पर्धा निर्माण झाली असून, काही तलाठ्यांनी इच्छित सज्जा मिळविण्यासाठी राजकीय शिफारशींचा आधार घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.

परभणी जिल्ह्यातील महसूल आस्थापनेवरील गट ‘क’ संवर्गातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी), मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या समुपदेशन पद्धतीने बदल्या शनिवार, १३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहेत. या प्रक्रियेत गंगाखेड तालुक्यातील विविध तलाठी सज्जांवर कार्यरत असलेल्या तलाठ्यांच्या बदल्यांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याने महसूल विभागातील हालचालींना वेग आला आहे.

तालुक्यातील कोणता तलाठी सज्जा अधिक महत्त्वाचा किंवा महसुली दृष्ट्या प्रभावी आहे, याची माहिती घेत अनेक तलाठ्यांनी इच्छित सज्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. यामध्ये एका तलाठ्याने आपल्या पसंतीच्या सज्जासाठी लोकप्रतिनिधीचे शिफारसपत्र जोडून वरिष्ठांकडे मागणी केल्याचेही बोलले जात आहे.

पारदर्शक बदली प्रक्रियेची मागणी

नियमांनुसार एका पदावर तीन वर्षे आणि एका तालुक्यात सहा वर्षांपेक्षा अधिक सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीस पात्र मानले जाते. त्यामुळे अनेक वर्षांपासून गंगाखेड तालुक्यात कार्यरत असलेल्या तलाठ्यांची यावेळी तालुक्याबाहेर बदली होणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गावागावांतील नागरिकांनी वारंवार एकाच सज्जावर किंवा तालुक्यात राहणाऱ्या तलाठ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी संधी न देता त्यांची तालुक्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवर आधारित निर्णय न घेता संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

दोन तलाठ्यांची एकाच तालुक्यात ९ व १२ वर्षे सेवा

गंगाखेड तालुक्यातील दोन तलाठ्यांनी अनुक्रमे ९ आणि १२ वर्षे सेवा बजावल्याची चर्चा महसूल विभागात सुरू आहे. यापैकी काही काळासाठी इतर तालुक्यांमध्ये बदली झाल्यानंतर पुन्हा गंगाखेडमध्ये परत येत त्यांनी पूर्वीच्या सज्जांवरच नियुक्ती मिळविल्याचे बोलले जात आहे. आता पुन्हा आपल्या पसंतीचे सज्जा मिळविण्यासाठी राजकीय प्रभावाचा वापर सुरू असल्याची चर्चा महसूल वर्तुळात रंगली आहे.

लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवरून बदली नको

महसूल विभागातील गट ‘क’ संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना आमदार, खासदार किंवा इतर लोकप्रतिनिधींच्या शिफारशी अथवा दबावाला बळी न पडता संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबवावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. गतवर्षीप्रमाणे वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: