Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

श्री संत गोरोबाकाका

श्री संत गोरोबाकाकांच्या वाड्याचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानिमित्त उत्साहात साजरा

Sri Sant Gorobakaka: धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे श्री संत गोरोबाकाका यांच्या वाड्याचा तेरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने भक्तीपूर्ण वातावरणात बुधवारी (दि.१०) साजरा करण्यात आला.


श्री संत गोरोबाकाकांच्या वाड्याचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानिमित्त उत्साहात साजरा

Sri Sant Gorobakaka |

लातूर (Sri Sant Gorobakaka) : धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे श्री संत गोरोबाकाका यांच्या वाड्याचा तेरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने भक्तीपूर्ण वातावरणात बुधवारी (दि.१०) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून कुंभार समाजाचे पदाधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुधवारी श्री संत गोरोबा काका यांच्या तेर नगरीत गोरोबा काका यांच्या वाड्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. काकांच्या वाड्याच्या वर्धापन दिनानिमित्त तेर येथील ऐतिहासिक श्री संत गोरोबा काकांच्या वाड्यापासून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी निघाली. ही दिंडी श्री संत गोरोबाकाकांच्या समाधी मंदिरापर्यंत काढण्यात आली. या दिंडीत महिला पुरुष, वारकरी व पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा मोठा सहभाग होता. 

काकांच्या वाड्याच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तनकार तसेच प्रवचनकार श्री दत्ता महाराज आंबीकर यांचे प्रवचन पार पडले. या सर्व कार्यक्रमास कुंभार समाजाचे नेते व अखिल भारतीय प्रजापती कुंभार महासंघाचे उपाध्यक्ष नागनाथ कुंभार, दत्ता धाडसकर, महादेव खटावकर. श्याम शेठ राजे, रामदास कुंभार, चनबस वायकर, विश्वनाथ कोलमकर, विनायक राऊत, रंगनाथ सूर्यवंशी, सावंडे, महेश सायकर, पांडुरंग तात्या कुंभार, महेश इटकर, अर्जुन दळे, कैलास कुंभार, दीपक चित्रे, संजय गिरकर, प्रभू गोरे, शशिकला कुंभार, मळेवाडकर, भागवत तात्या कुंभार, ज्ञानेश्वर माऊली कुंभार, नामदेव कुंभार, नामदास सांगवेकर यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले कुंभार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.