Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली क्रीडा घोटाळा : शिबिरांची फक्त कागदावर नोंद, २६७ संस्थांनी गिळंकृत केले १.७७ कोटी

हिंगोली जिल्हा क्रीडा विभागात शिबिरांच्या नावाखाली तब्बल १.७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे.


हिंगोली क्रीडा घोटाळा  शिबिरांची फक्त कागदावर नोंद २६७ संस्थांनी गिळंकृत केले १७७ कोटी

Sports Scam |

अनुदानाच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार; चौकशीला वेग

हिंगोली (Sports Scam) : हिंगोली जिल्हा क्रीडा विभागात शिबिरांच्या नावाखाली तब्बल १.७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार समोर आला आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी शासनाकडून संस्थांना अनुदान दिले जाते. मात्र प्रत्यक्षात मैदानावर एकही शिबिर न घेता २६७ संस्थांनी हे अनुदान लाटल्याचे धक्कादायक वास्तव चौकशीत उघड होत आहे.

२०१२-१३ ते २०२०-२१ या नऊ वर्षांच्या कालावधीत क्रीडा विभागाने संस्थांकडून प्रस्ताव मागवून प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान वाटप केले. नियमाप्रमाणे शिबिर पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल क्रीडा विभागाला देणे बंधनकारक होते. पण एकदा पैसे दिल्यानंतर संबंधित संस्थांनी शिबिर घेतले की नाही, याची खातरजमा करण्याची तसदी तत्कालीन अधिकाऱ्यांनी घेतलीच नाही. याच ढिलाईचा फायदा घेत अनेक संस्थांनी फक्त कागदोपत्री शिबिरे दाखवून शासकीय निधीवर डल्ला मारला.

या संदर्भात डॉ. रवी थोरात यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर क्रीडा विभागाने अंतर्गत पाहणी केली असता २६७ संस्थांचे व्यवहार संशयास्पद आढळले. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी थोरात यांनी प्रशासन व शासनाकडे वेळोवेळी निवेदन पाठवले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात काही वेळा सुनावणी देखील घेण्यात आली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवार, २२ तारखेपासून तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या पथकाने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दाखल होत जुने प्रस्ताव आणि दस्तऐवज बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सर्व प्रस्तावांची काटेकोर तपासणी सुरू असून चौकशीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे. क्रीडा विभागाच्या निधीचा अशा पद्धतीने झालेला अपहार आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related to this topic: