Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

NEET पेपर फुटी प्रकरण

दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुरखेडा तालुक्यातील युवकांचा सहभाग

NEET paper leak case: दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी व विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या सोनम वांगचुंग (sonam wangchung) समर्थन आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम


दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुरखेडा तालुक्यातील युवकांचा सहभाग

NEET paper leak case |

 

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पोहचला दुर्गम भागातील बुलंद आवाज

कुरखेडा (NEET paper leak case) : दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या पेपर फुटी व विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या सोनम वांगचुंग (sonam wangchung) समर्थन आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम कुरखेडा तालुक्यातील प्रतीक साखरे आणि प्रीतम वालदे यांनी सहभाग नोंदवित विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ते आंदोलनस्थळी उपस्थित राहिले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक या (NEET paper leak case) आंदोलनात सहभागी झाले असून, जंतर-मंतर परिसर घोषणांनी दणाणून गेला. कुरखेडा तालुक्यातील (kurkheda Taluka) या दोन युवकांच्या सहभागामुळे स्थानिक पातळीवरही या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे. प्रतीक साखरे आणि प्रीतम वालदे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र व संबंधित यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांनाsupport to students)पाठिंबा दिला.