Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

सोलार साहित्य चोरी

सोलार साहित्य चोरांच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश!

Solar Plagiarism Case: गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा यंत्रणा, विद्युत केबल्स, कॉपर वायर तसेच औद्योगिक भागातील मौल्यवान विद्युत


सोलार साहित्य चोरांच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश

Solar Plagiarism Case |

 

१३ गुन्ह्यांची उकल, १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लातूर (Solar Plagiarism Case) : गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील सोलार प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतातील सौरऊर्जा यंत्रणा, विद्युत केबल्स, कॉपर वायर तसेच औद्योगिक भागातील मौल्यवान विद्युत साहित्य एका सराईत आंतरजिल्हा (Solar Plagiarism Case) चोरट्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर पर्दाफाश केला असून तब्बल १३ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले.

९ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाच नंबर चौकात तात्काळ सापळा रचून बालाजी अरुण काळे (रा. सरमकुंडी फाटा, ता. वाशी, जि. धाराशिव) व आकाश उर्फ भैया नवनाथ पवार (रा. सुर्डी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. शिराढोण पारधी पिढी, जि. धाराशिव) या दोघांना टाटा व्हिस्टा कारसह ताब्यात घेतले.

कारची झडती घेतली असता वाहनातील पिशवीमध्ये तब्बल ११ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. (Solar Plagiarism Case) आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सोलार पॅनल, कॉपर वायर, केबल वायर, विद्युत साहित्य तसेच बोअरवेल मोटारींच्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेले साहित्य विविध ठिकाणी विकून त्यातून मिळालेली रक्कमच त्यांच्या ताब्यात सापडल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान आरोपींनी अरुण उर्फ बल्ली बारीकराव काळे, पिंटू मच्छिंद्र काळे, सुनील बबन शिंदे आणि शाम उर्फ अनिल बबन शिंदे या साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार या टोळीने मुरुड, भादा, चाकूर, औसा, रेणापूर, उदगीर आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ गुन्हे उघडकीस आले. (Solar Plagiarism Case) सदर आरोपींना अटक करून मुरुड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७३/२०२६ अन्वये पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून चोरीस गेलेल्या उर्वरित साहित्याचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

यांनी केली कामगिरी...
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड,मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, युवराज गिरी, रियाज सौदागर, सिद्धेश्वर मदने राहुल कांबळे, गोविंद भोसले, अंजली गायकवाड, शैलेश सुडे, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर आदींच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने पार पाडली.