Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Smart Digital Meter

परवानगी न घेता बसविलेला स्मार्ट डिजिटल वीज मीटर काढण्याची मागणी

मीटर तात्काळ हटवून पूर्वीचा जुना मीटर पुन्हा बसवावा, अशी मागणी त्यांनी ३१ जुलै रोजी महावितरणच्या विद्युत अभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.


परवानगी न घेता बसविलेला स्मार्ट डिजिटल वीज मीटर काढण्याची मागणी

मानोरा : तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथील रहिवासी छाया श्रीराम राठोड यांनी त्यांच्या घरावर पूर्वी बसविलेला जुना वीज मीटर कोणतीही पूर्वसूचना, संमती किंवा परवानगी न घेता काढून त्याऐवजी स्मार्ट डिजिटल वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा मीटर तात्काळ हटवून पूर्वीचा जुना मीटर पुन्हा बसवावा, अशी मागणी त्यांनी ३१ जुलै रोजी महावितरणच्या विद्युत अभियंत्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या घरावरील वीज जोडणीवर कोणतीही पूर्वकल्पना न देता, विश्वासात न घेता तसेच लेखी संमती न घेता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्मार्ट डिजिटल वीज मीटर बसविला. या मीटरबाबत कोणतीही लेखी सूचना देण्यात आली नव्हती. तसेच मीटर बदलण्यापूर्वी त्यांची संमती किंवा परवानगीही घेण्यात आलेली नव्हती.

राठोड यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, त्यांना स्मार्ट डिजिटल वीज मीटर मान्य नसून तो त्यांच्या इच्छेविरुद्ध बसविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित डिजिटल मीटर तात्काळ काढून पूर्वीची जुनी वीज मीटर व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी. तसेच भविष्यात ग्राहकांची लेखी संमती आणि परवानगी न घेता अशा प्रकारची कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ग्राहकांमध्ये नाराजी

दरम्यान, महावितरणकडून स्मार्ट डिजिटल वीज मीटर बसविण्याची मोहीम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र ग्राहकांना विश्वासात न घेता तसेच पूर्वसूचना न देता मीटर बदलण्यात येत असल्याचा आरोप होत असून, यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: