Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

वाढीव मालमत्ता कर

वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल!

Increased property taxes: शिवसेने चिखलीच्या शहरप्रमुखाने शुक्रवारी कर वाढीवर विरोध करून नगर परिषदेचे आकारणी निवेदन दिले. महागाई, बेरोजगारीमुळे आर्थिक दबावात असलेल्या नागरिकांचा तत्काळ पुनरुचार मागितला


वाढीव मालमत्ता कराविरोधात शिवसेनेचा हल्लाबोल

Increased property taxes |

 

वाढीव कराविरोधात शिवसेनेचे निवेदन ; कर आकारणीचा तात्काळ पुनर्विचार करण्याची मागणी

२ टक्के शास्ती रद्द करून मुदतवाढ देण्याची मागणी ; सर्वसामान्यांना दिलासा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

चिखली (Increased property taxes) : चिखली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणीविरोधात शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी दि. १९  मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांवर वाढीव कराचा अन्याय होत असून कर आकारणीचा तात्काळ पुनर्विचार करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

शहरातील नागरिकांना नुकत्याच वितरित करण्यात आलेल्या मालमत्ता कर बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आधीच महागाई, बेरोजगारी, वाढते वीजबिल, शिक्षण व आरोग्य खर्चामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असताना नगर परिषदेकडून करण्यात आलेली कर वाढ नागरिकांच्या आवाक्याबाहेरची असल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.

नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वाढले असले तरी अनेक भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी, स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. अशा परिस्थितीत सुविधा न देता कर वाढ लादणे योग्य नसल्याची भूमिका शिवसेनेने मांडली. तसेच नगर परिषदेकडून ३० जूनपूर्वी कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानंतर दरमहा २ टक्के शास्ती आकारली जाणार असल्याने नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव कर आणि शास्तीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

शिवसेनेने नगर परिषद प्रशासनाकडे वाढीव कर आकारणीचा तात्काळ पुनर्विचार करावा, कर वाढीचे निकष व सूत्र सार्वजनिक करावेत, नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी विशेष लोकसुनावणी आयोजित करावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय नागरिकांना विशेष सवलत द्यावी, (Increased property taxes) कर भरण्याची मुदत वाढवावी तसेच पुनर्विचार पूर्ण होईपर्यंत वाढीव कर व शास्तीची अंमलबजावणी स्थगित करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

हे निवेदन शिवसेना चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, शिवसेना नेते कपिल खेडेकर, तालुकाप्रमुख गजानन मोरे, माजी शहरप्रमुख निलेश अंजनकर, विठ्ठल जगदाळे, अनमोल ढोरे, गजानन पवार, युवासेना शहरप्रमुख राजेश पवार, कल्पनाताई बोधेकर, शिवाजी शिराळे, गजानन म्हस्के यांच्यासह निलेश रक्ताडे, पवन चिंचोले, भगवान पिटकर, अमर सुसर, कैलास हलकुटे, विनोद वणारे, साहेबराव अंभोरे, अमर काळे, गोविंद बोधेकर, विकी निकाळजे, शेख बाबू भाई, योगेश गवई, विष्णू बळी, सागर झगरे, दुशांत गायकवाड, सचिन देशमाने, राकेश चोपडा आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.