Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासदार नागेश पाटील आष्टीकर

खासदार नागेश आष्टिकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सेनगावात दहन

MP Nagesh Patil Ashtikar: खासदार नागेश आष्टिकर यांचा पुतळ्याचे दहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोध करून शिवसेनेतील अनेक सदस्यांनी कडक प्रतिपादन केले. सेनगावातील शांतपणा उलटला.


खासदार नागेश आष्टिकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सेनगावात दहन

MP Nagesh Patil Ashtikar |


‘कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळ करणाऱ्यां विरोधात संताप’

सेनगाव (MP Nagesh Patil Ashtikar) : शिवसेनेतील राजकीय घडामोडींना आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या असंतोषाला सेनगाव शहरात सोमवारी ता १७ रोजी तीव्र स्वरूप प्राप्त झाले. ऊबाटा गटाचे खासदार नागेश आष्टिकर (MP Nagesh Patil Ashtikar) यांच्या भूमिकेविरोधात संतप्त शिवसैनिकांनी तहसील कार्यालय परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदविला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख जगदीश गाढवे, करण देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्याची मागणी केली.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ज्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, जिवाचे रान केले, त्याच नेत्याने पक्षाशी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांशी प्रतारणा केल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हा संताप व्यक्त करण्यात आला.”

तहसील कार्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान काही काळ वातावरण तापले होते. मात्र आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनकर्त्यांनी संबंधित नेत्याच्या भूमिकेचा निषेध करत आगामी काळातही पक्षनिष्ठेला धक्का पोहोचविणाऱ्या निर्णयांविरोधात आवाज उठविण्याचा इशारा दिला. या आंदोलनामुळे सेनगावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून स्थानिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Related to this topic: