Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खा. नागेश पाटील आष्टीकर

‘आमच्यावर अविश्वास दाखवला तेव्हाच निर्णय झाला’: खा. नागेश पाटील आष्टीकर यांची खळबळजनक प्रतिक्रिया

MP Nagesh Patil Ashtikar: हिंगोलीच्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेतून ठाकरेसोबत सांगड टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षातील अविश्वास आणि मतदत्तांवर असलेली नकारात्मक


‘आमच्यावर अविश्वास दाखवला तेव्हाच निर्णय झाला’ खा नागेश पाटील आष्टीकर यांची खळबळजनक प्रतिक्रिया  

MP Nagesh Patil Ashtikar |

हिंगोली (MP Nagesh Patil Ashtikar) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी थेट ‘ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला’ अशी प्रतिक्रिया देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. ‘आमच्यावर अविश्वास दाखवला गेला तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं’ असे स्पष्ट शब्दांत आष्टीकर यांनी सांगितले. प्रसार माध्यमांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आपली नाराजी बोलून दाखवली. पक्ष नेतृत्वाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  

आष्टीकर (MP Nagesh Patil Ashtikar) म्हणाले, ‘आम्ही प्रामाणिकपणे पक्ष वाढवला, मतदारसंघात काम केलं. पण जेव्हा विश्वासच उरला नाही, तेव्हा सोबत राहण्यात अर्थ नाही. कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्वाभिमान महत्त्वाचा आहे. त्यामुळे ठाकरेंची साथ तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.’  

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आष्टीकर हे ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत घडामोडींमुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनीच जाहीरपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  

या प्रतिक्रियेमुळे हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आष्टीकर यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार की स्वतंत्र भूमिका घेणार, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.

Related to this topic: