Breaking News
  • आजपासून संपूर्ण देशात ''VB-G RAM G'' कायदा लागू
  • १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन; शासनाचा मोठा निर्णय
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये भडकला हिंसाचार; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू...
  • व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा संशयास्पद मृत्यू; पुनःशवविच्छेदनात २१ अवयव गायब असल्याचा दावा
  • RCB ची मालकी बदलली; 16,660 कोटींच्या व्यवहाराला CCI ची मंजुरी
  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! बस जळून खाक; 7 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी
  • मुंबईसह ठाण्यात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट
  • लोहगडावर चेतन चौधरीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन; सिया-चेतन ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
  • शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; महापालिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

शिवसेना आमरण उपोषण

​​​​​​​पोलीस प्रशासनाविरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण; पोलीस अधीक्षकांच्या चौकशीची मागणी!

Shiv Sena Hunger Strike: जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कथित ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ शिवसेना, धर्मवीर युथ फाऊंडेशन आणि विविध सामाजिक संघटना आमरण उपोषण


​​​​​​​पोलीस प्रशासनाविरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण पोलीस अधीक्षकांच्या चौकशीची मागणी

Shiv Sena Hunger Strike |

 

धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; शेकडो सहभागी..

बुलढाणा (Shiv Sena Hunger Strike): जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कथित ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ शिवसेना, धर्मवीर युथ फाऊंडेशन आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला (Shiv Sena Hunger Strike) सुरुवात करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी करून निष्क्रिय कारभाराची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

धर्मवीर युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिक, युवक, महिला व नागरिक सहभागी झाले. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्यात हातभट्टी दारू, जुगार, वरली मटका, वाळू तस्करी, गोवंश तस्करी, अमली पदार्थांची विक्री यांसारखे अवैध धंदे वाढत असून त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा करण्यात आला. यावेळी एका शेतकरी पुत्राला आजारी आईसाठी औषध आणण्यासाठी जात असताना कोणतीही चौकशी न करता त्याच्याशी मारहाण केल्याचा आरोप पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी केला. अशा घटनांमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचे त्यांनी म्हटले.

घरफोडी, दुचाकी व चारचाकी चोरी, मोबाईल चोरी, अल्पवयीन मुली बेपत्ता होणे, गोवंश तस्करी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असून अनेक गुन्ह्यांचा अद्याप छडा लागलेला नसल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच जळगाव जामोद तालुक्यातील रसलपूर परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा तपास रखडल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. या (Shiv Sena Hunger Strike) सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी पृथ्वीराज संजय गायकवाड यांनी, "संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही," असा इशारा दिला. आज १ जून रोजी सुरू झालेले आंदोलनात आंदोलनात नगरपालिकेचे गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अल्पसंख्याक सेना, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पदाधिकारी, (Shiv Sena Hunger Strike) शिवसैनिक आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.