Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली शिव संवाद मेळावा

हिंगोली येथे शिवसेनेचा ‘शिव संवाद मेळावा’ उत्साहात संपन्न; खासदार श्रीकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत

Hingoli Shiv Sanvad Melava: हिंगोली येथे शिवसेनेच्या ‘शिव संवाद मेळाव्यात’ खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि इतर पक्षीव्हक्ता भाषणे


हिंगोली येथे शिवसेनेचा ‘शिव संवाद मेळावा’ उत्साहात संपन्न खासदार श्रीकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत

Hingoli Shiv Sanvad Melava |

हिंगोली (Hingoli Shiv Sanvad Melava) : शिवसेना संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील महावीर भवनमध्ये ‘शिव संवाद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार संतोष बांगर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि माजी खासदार आनंद परांजपे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Hingoli Shiv Sanvad Melava) हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते. 

खासदार डॉ. शिंदे यांचे हिंगोलीत आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात व घोषणांच्या गजरात स्वागत केले. मेळाव्याला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी पक्षासाठी अहोरात्र झटणारे आमदार संतोष बांगर यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. "संतोष बांगर हे सर्वसामान्यांसाठी व पक्षवाढीसाठी सतत कार्यरत असतात," अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. 

या (Hingoli Shiv Sanvad Melava) मेळाव्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह इतर मान्यवरांचीही समायोजित भाषणे झाली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बळकट करणे व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा मेळाव्यामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावल्याने महावीर भवनचा परिसर शिवसैनिकांच्या उत्साहाने दुमदुमून गेला होता.

Related to this topic: