Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > आपले शहर > पुणे

Shahuwadi

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला; भिवंडीत कारमधून मृतदेह जप्त

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न फसला भिवंडीत कारमधून मृतदेह जप्त

Shahuwadi |

शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्येप्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू पाटीलला अटक; मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव पोलिसांनी उधळला

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (40) यांची हत्या झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी त्यांच्याशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (40) याला भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात लग्नासाठी होत असलेल्या दबावातून हा गुन्हा घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुरेखा न्यारे या शिरगाव येथील रहिवासी असून त्या विधवा होत्या. त्यांचे आणि आरोपी प्रकाश पाटील यांचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काडबाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला सुरेखा न्यारे यांच्याबाबत संशय होता की त्यांचे अन्य एका व्यक्तीसोबतही संबंध आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील स्वतःच्या शेतातील फार्महाऊसमध्ये आरोपीने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह गुंडाळून स्वतःच्या कारमध्ये ठेवण्यात आला.

गुन्ह्यानंतर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने कारमधून कोल्हापूरहून सुमारे 350 किलोमीटर अंतर पार करत ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या काशेली परिसराकडे प्रवास केला. मात्र, सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध घेत तपासणी केली. तपासणीदरम्यान कारमध्ये मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या कारवाईनंतर पोलिसांनी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला ताब्यात घेत अटक केली. वाहन जप्त करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) (हत्या) अंतर्गत 'झिरो एफआयआर' नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात येणार आहे.

मृतदेहाची नेमकी कुठे आणि कशा प्रकारे विल्हेवाट लावण्याचा आरोपीचा उद्देश होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी आणि शाहूवाडी पोलीस संयुक्तपणे करत आहेत.

Related to this topic: