Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

सेवाशक्ती एस.टी. कर्मचारी संघ

सेवाशक्ती एस.टी. कर्मचारी संघ नामफलकाचे अनावरण

SevaShakti ST Union: सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाने लातूर विभागाचा दोन दिवसीय दौरा करून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.


सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघ नामफलकाचे अनावरण 

SevaShakti ST Union |

 

लातूर विभागीय दौऱ्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक

लातूर (SevaShakti ST Union) : सेवाशक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर व केंद्रीय कार्याध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे केंद्रीय सरचिटणीस सतीश मिटकरी यांनी दि. 21 व 22 जुलै रोजी लातूर विभागाचा दोन दिवसीय दौरा करून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान उदगीर व अहमदपूर आगार येथे संघाच्या नामफलकांचे अनावरण करण्यात आले. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लातूर आगार, लातूर मध्यवर्ती कार्यशाळा तसेच विभागीय कार्यालय येथे विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच विविध आगारांतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या व मागण्या मांडल्या. कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक अडचणी, प्रशासकीय प्रश्न, कामकाजातील अडथळे आणि इतर प्रलंबित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अनेक समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघासह महामंडळातील सर्व कामगारांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या दौऱ्यामुळे (SevaShakti ST Union) लातूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी हितासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे केंद्रीय सरचिटणीस सतीशजी मिटकरी यांनी सांगितले.

यावेळी नूतन केंद्रीय उपाध्यक्ष शशिकांत ढाळे, केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोडके, केंद्रीय सदस्य विठ्ठल मंढाळकर, बालाजी गोणे,श्रीनिवास काळे, नामदेव पाटील, रफिक शेख, उद्धव कांबळे, विभागीय अध्यक्ष बाबुराव दिंडी, विभागीय सचिव बाळू नागरगोजे, विभागीय कार्याध्यक्ष संगमेश घुमे यांच्यासह लातूर विभागातील सर्व आगारांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.