Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सपोनी संग्राम जाधव

सेनगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सपोनी संग्राम जाधव: अवैध धंदे व गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईचे संकेत

API Sangram Jadhav: सेनगाव पोलीस ठाण्यावर नव्या प्रभारीपदाची नियुक्ती झाली. सांग्राम जाधव यांचे नेतृत्व कायद्याच्या अंमलबजावणीत व अवैध धंदांवर नोकरी करेल.


सेनगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी सपोनी संग्राम जाधव अवैध धंदे व गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईचे संकेत

API Sangram Jadhav |

सेनगाव (API Sangram Jadhav) : सेनगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस नीरीक्षक दीपक मस्के यांची हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी वसमत शहर येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव (API Sangram Jadhav) यांची सेनगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

सेनगाव शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याला नव्या नेतृत्वाची नियुक्ती झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सेनगाव ठाणे हद्दीत वाढती अवैध वाहतूक, अवैध धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नव्या अधिकाऱ्यांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नूतन प्रभारी संग्राम जाधव यांची सन २०१२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुलगी गावचे मूळ रहिवासी असून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कंधार तसेच हिंगोली जिल्ह्यातील हट्टा परिसरात सेवा बजावली आहे. त्यानंतर त्यांची वसमत शहर येथे नियुक्ती करण्यात आली होती. विविध ठिकाणच्या सेवेत त्यांनी कायदा अंमलबजावणीचा अनुभव मिळवला आहे.

कायद्याचे राज्य प्रस्थापित करणार: सपोनी जाधव

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव (API Sangram Jadhav) म्हणाले की, "सेनगाव परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे माझे प्राधान्य आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घातला जाईल. सर्वसामान्य, वंचित आणि अन्यायग्रस्त नागरिकांना संविधानिक न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे." ठाणे हद्दीतील ७ बीट अंमलदारांना कडक सूचना देत, अवैध वाहतूक आणि शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवरही तातडीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ८३ गावांच्या कार्यक्षेत्रात निर्भीडपणे पोलीस कामकाज पार पाडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related to this topic: