Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

रेती अवैध वाहतूक

रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.


रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त २४२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal sand transportation |


सेनगाव पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

सेनगाव (Illegal sand transportation) : सेनगाव पोलिसांनी अवैध रेती वाहतुकी विरोधात मध्यरात्री धडक कारवाई करत दोन टिप्परांसह सुमारे २४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 

सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संग्राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. ४ जुलै रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास मौजे मकोडी गावाजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी जनार्धन पंडीतराव खताळ रा. आडोळ, प्रकाश बाबाराव शिंदे रा. सुकळी बुद्रुक आणि नामदेव उत्तमराव पोले रा. उमरदरी यांनी संगनमत करून दोन टिप्परमधून कोणतीही वैध परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवून रेतीची बेकायदेशीर वाहतूक केल्याचा आरोप आहे.

कारवाई (Illegal sand transportation)दरम्यान पोलिसांनी दोन आयशर टिप्पर तसेच त्यामधील प्रत्येकी सुमारे तीन ब्रास रेती असा एकूण २४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, गौण खनिज अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. चव्हाण करीत असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Related to this topic: