Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

Self-Styled Godman

धक्कादायक! पुण्यातील ‘देवाचा अवतार’ ठरला भक्षक...स्वयंघोषित बाबाने महिलेचे 6 वर्षे केले शोषण

पुण्यातील वाघोली परिसरात स्वतःला देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबासह त्याच्या सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.


धक्कादायक पुण्यातील ‘देवाचा अवतार’ ठरला भक्षकस्वयंघोषित बाबाने महिलेचे 6 वर्षे केले शोषण

Self-Styled Godman |

पुण्यात बनावट बाबाचा धक्कादायक प्रकार उघड; महिलेवर लैंगिक अत्याचार, जबरदस्तीने घटस्फोट, विजेचे धक्के आणि मूत्र पिण्यास भाग पाडल्याचा आरोप

पुणे (Self-Styled Godman) : पुण्यातील वाघोली परिसरात स्वतःला देवाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबासह त्याच्या सात साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेचे अनेक वर्षे लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या बाबावर करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिलेला त्याने स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे.

आरोपी राधेश्याम मिश्रा उर्फ राधामोहन मिश्रा हा वाघोलीतील उबळे नगर परिसरात 'आधुनिक गुरुकुल' नावाने आश्रम चालवत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मिश्रा अनेक वर्षांपासून लोकांची फसवणूक करून त्यांचे शोषण करत होता. पीडित महिला सुमारे 2010 च्या सुमारास त्याच्या संपर्कात आली होती.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मिश्रा याने हळूहळू महिलेला तिच्या कुटुंबापासून दूर केले आणि पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. 2010 ते 2016 या कालावधीत त्याने महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिला मारहाण करणे, विजेचे धक्के देणे आणि तिचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करणे असे प्रकारही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे व्हिडीओ दाखवून मिश्रा महिलेची ब्लॅकमेलिंग करत होता. स्वतःकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत तो पीडितेच्या कुटुंबीयांनाही धमकावत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक अनुयायांना तो देवाचा अवतार असल्याचा विश्वास बसवला होता. त्याच प्रभावाखाली महिलेला त्याचे मूत्र पिण्यास भाग पाडण्यात आले. याच काळात आश्रम आणि स्वतःच्या फायद्यासाठी मिश्रा याने महिलेकडून चोरीचे प्रकारही करून घेतल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी आश्रमावर छापा टाकल्यानंतर भूमिगत खोलीतून मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त केले. या कारवाईत 12 लॅपटॉप, 11 मोबाईल फोन, 19 हार्ड डिस्क, अनेक पेन ड्राइव्ह आणि कॅसेट्स हस्तगत करण्यात आल्या. याशिवाय सुमारे 6.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 15 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात औषधी गोळ्या आणि विविध प्रकारची औषधेही सापडल्याने तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात राधेश्याम मिश्रा याच्यासह त्याचा निकटवर्तीय 'स्वामी' कंवल नयन याच्यासह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना आणखी पीडित व्यक्ती पुढे येण्याची शक्यता वाटत असून, अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना शनिवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: