Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘शाळा प्रवेश उत्सव’

जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडली.


जिप सीईओ विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘शाळा प्रवेश उत्सव’

School Admission Festival |

प्रवेशदिनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; आरोग्य विभागाला विशेष सूचना

हिंगोली (School Admission Festival) : जिल्हा परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. यावेळी आगामी शाळा प्रवेश उत्सवाच्या तयारीसह विविध आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नामदेव पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. संदीप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. नारायण शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून यंदाचा शाळा प्रवेश उत्सव विशेष उपक्रमांसह साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी प्रवेशदिनी सकाळी ९.३० वाजता सर्व शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

आरोग्य सेवा वेळेत देण्याचे निर्देश

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात तसेच विनापरवानगी अनुपस्थित राहू नये, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित पाणी शुद्धीकरण, पाण्याचे नमुने आणि टीसीएल नमुन्यांची वेळेत तपासणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

विविध आरोग्य कार्यक्रमांचा आढावा

बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, साथरोग नियंत्रण उपाययोजना तसेच लाल कार्डांचे हिरव्या कार्डांमध्ये रूपांतर करण्याबाबत आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्यात आला.

‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत नेत्रदान जनजागृती, आयुष्मान भारत योजनेचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच ओपीडीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे आयुष्मान कार्ड आहे की नाही याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तंबाखूमुक्त शासकीय कार्यालयांवर भर

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांची तपासणी करून तंबाखू सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. याशिवाय एनक्वास (NQAS) मानांकनासाठी ११ आरोग्य संस्थांची निवड, दंत तपासणी शिबिरे, मानसिक आरोग्य, सिकलसेल, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि रुग्ण कल्याण समितीच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

माता-बालक आरोग्य सेवांवर विशेष लक्ष

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांची नोंदणी व नियमित तपासणी, प्रसूतीनंतर ४२ दिवसांपर्यंत माता व बालकांचे आरोग्य निरीक्षण आणि आवश्यक सेवा देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जननी सुरक्षा योजनेचाही आढावा घेण्यात आला.

दरम्यान, १०२ रुग्णवाहिका सेवा सतत कार्यरत ठेवून रुग्णवाहिकांमध्ये आपत्कालीन सुविधा अद्ययावत ठेवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

Related to this topic: