Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

अनुसूचित जाती आंदोलन

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

Scheduled Caste Andolan: अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात चिखलीत समाजबांधवांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनात संविधानाच्या कलम 14, 15, 16 व 341 यांचा उल्लेख


अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात निवेदन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन

Scheduled Caste Andolan |

चिखली (Scheduled Caste Andolan) : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवून संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे, या मागणीसाठी 4जुन रोजी चिखली येथील समाजबांधवांनी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी बुलढाणा व तहसीलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन दिले. निवेदनात भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 16 व 341 चा उल्लेख करून अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण हे समता, सामाजिक न्याय व समान संधीच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडून सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचू शकते, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

यावेळी उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करणे, (Scheduled Caste Andolan) अनुसूचित जातींची जातीनिहाय जनगणना करणे, शासकीय व निमशासकीय सेवांमधील अनुशेष पदे भरणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे व शैक्षणिक सुविधा वाढविण्याच्या मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास अनुसूचित जाती उपवर्गीकरण समिती, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर तीव्र आंदोलन (Scheduled Caste Andolan) छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर मोठ्या संख्येने समाजबांधवांच्या सह्या आहेत.

Related to this topic: