Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलीस जमादार अपघाती मृत्यू

भटसावंगी तांडा येथील पोलीस जमादार अपघातात ठार; पत्नी गंभीर जखमी

Police Accident Death: १९ जून रोजी सातारा पोलिस ठाण्याकडील पोलिस जमादार श्रावण भावराव राठोड यांचा वाकेश्वर-बावधन मार्गावर अपघात होईल. त्यांनी पत्नीच्या साथीने गेल्या असतानाही अज्ञात वाहनाने धडक


भटसावंगी तांडा येथील पोलीस जमादार अपघातात ठार पत्नी गंभीर जखमी

Police Accident Death |

 

सातारा जिल्ह्यात राज्य मार्गावर अपघात

हिंगोली (Police Accident Death) : तालुक्यातील भटसावंगी तांडा येथील रहिवासी व सातारा पोलीस ठाण्यात  कार्यरत असलेले  पोलीस जमादार श्रावण भावराव राठोड व पत्नी हे प्रवास करत असताना वाकेश्वर बावधन राज्य मार्गावर असलेल्या अज्ञात वाहनाने १९ जून रोजी पहाटे जोराची धडक देऊन या धडकेत राठोड हे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आणि पत्नी गंभीरित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर दवाखान्यात सुरू आहेत. याप्रकरणी  वाकेश्वर बावधन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

सातारा येथील वाई-सातारा मार्गावर वाकेश्वर-  वचक ठेवणारे (Police Accident Death) पोलीस जमादार श्रावण भावराव राठोड  म्हणून वाई -बावधन  पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असताना १९ जून रोजी  पहाटेच्या सुमारास झालेल्या  अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अपघातात अज्ञात वाहन चालकाने स्त्राव पोलीस जमादार श्रावण राठोड यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते जागीच ठार झाले. पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हे आपल्या पत्नीसह वाई-पाचवड रस्त्यावरून प्रवास करत होते. वाकेश्वर-बावधन हद्दीत आले असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, श्रावण राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. (Police Accident Death) गंभीर जखमी असलेल्या त्यांच्या पत्नीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.श्रावण राठोड हे वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत होते. अपघातानंतर धडक देणारे अज्ञात वाहन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी फरार वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या अपघाताचे व  निधनाचे वृत्त हिंगोली तालुक्यातील  भटसावंगी तांडा येथे पसरतात गावात शोककळा पसरली होती.

Related to this topic: