Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

आ. संतोष बांगर

आ. संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून भव्य ‘माऊली वृद्धाश्रम' साकारणार

MLA Santosh Bangar: 'माऊली वृद्धाश्रम'च्या भौमिपूजनासाठी आमदारी संतोष बांगर यांचा माता-पिता हसतांना हस्ते करण्यात येत असले. या आश्रमात आढळणाऱ्या अतिशय गरजू वृद्धांसाठी मोफत पौष्टिक भोजन


आ संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून भव्य ‘माऊली वृद्धाश्रम साकारणार

MLA Santosh Bangar |

 

माता-पित्याच्या हस्ते भूमिपूजन

हिंगोली (MLA Santosh Bangar) : समाजातील निराधार आणि गरजू वृद्ध माता-पित्यांना हक्काचा आडोसा आणि सन्मानाचे जीवन मिळावे, या उदात्त हेतूने कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून आणि संपूर्ण स्वतःच्या (खाजगी) खर्चातून 'माऊली वृद्धाश्रम' उभारण्यात येत आहे. हिंगोली शहरातील प्रसिद्ध ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर परिसरात या वृद्धाश्रमाचा भव्य भूमिपूजन सोहळा नुकताच अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

विशेष म्हणजे, या वृद्धाश्रमाचे भूमिपूजन आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचे माता-पिता आई श्रीमती वच्छलाबाई लक्ष्मणराव बांगर आणि वडील श्री. लक्ष्मणराव बांगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्याच आई-वडिलांच्या हस्ते या पवित्र कार्याची सुरुवात करून आमदार बांगर यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आमदार संतोष बांगर यांच्या वैयक्तिक खर्चातून उभारल्या जाणार्‍या या 'माऊली वृद्धाश्रमात' वृद्ध लोकांसाठी अत्यंत दर्जेदार आणि सोयी-सुविधांनी युक्त अशी व्यवस्था केली जाणार आहे.

यामध्ये प्रवेश घेणार्‍या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला खालील सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील. वृद्धाश्रमात राहणार्‍या सर्व वृद्धांना रोज पौष्टिक आणि दर्जेदार मोफत जेवण तसेच राहण्याची उत्तम सोय केली जाईल. प्रत्येकाला लागणारे कपडे आणि इतर आवश्यक दैनंदिन वस्तू मोफत दिल्या जातील. आजारपणाच्या काळात त्यांच्यावर मोफत औषधोपचार आणि देखभालीची चोख व्यवस्था असेल.  ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिराच्या पवित्र आणि निसर्गरम्य परिसरात हे आश्रम असल्याने वृद्धांना मानसिक शांतता आणि भक्तीमय वातावरण लाभेल. या प्रसंगी बोलताना आमदार संतोष बांगर भावूक झाले.

त्यांनी (MLA Santosh Bangar) सांगितले की, 'आजच्या धावपळीच्या युगात अनेक कारणांमुळे काही वृद्ध माता- पित्यांवर एकाकी जीवन जगण्याची वेळ येते. अशा सर्व निराधार वृद्धांना हक्काची सावली आणि कुटुंबाप्रमाणे माया मिळावी, यासाठीच 'माऊली वृद्धाश्रम'ची संकल्पना मी मांडली. माझ्या आई-वडिलांच्या हस्ते याचे भूमिपूजन होणे हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. या आश्रमाचा संपूर्ण खर्च मी स्वतः करणार असून, येथील कोणत्याही सुविधेसाठी वृद्धांकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही.' यावेळी नगराध्यक्षा रेखाताई बांगर गटनेते श्रीराम बांगर उपनगराध्यक्ष माबुद बागवान नगरसेवक सुभाष बांगर गणेश बांगर, नितीन बांगर, कपिल खंडेलवाल, गुड्डू बांगर, विशाल गोटरे, साद अहमद चंदू लव्हाळे, रवींद्र वाढे, खली बांगर, सुमित कांबळे, रामकिशन बांगर, संदीप बांगर, भरत पहेलवान चौधरी उपस्थित होते.

Related to this topic: