Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

समता फाऊंडेशन

सलग चौथ्या वर्षी 'समता फाऊंडेशन'ची रोबोटेक्स इंडियामध्ये विजयी परंपरा कायम

Samata Foundation: णे येथे आयोजित रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रिसोडच्या समता फाऊंडेशनच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


सलग चौथ्या वर्षी समता फाऊंडेशनची रोबोटेक्स इंडियामध्ये विजयी परंपरा कायम

Samata Foundation |

रिसोड (Samata Foundation) : दि. १७ व १८ जुलै २०२६ रोजी पुणे येथे आयोजित रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये रिसोडच्या समता फाऊंडेशनच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फाऊंडेशनचा विद्यार्थी प्रसन्न निशांत बगडिया याने फोक रेस (Folk Race) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशासह समता फाऊंडेशनने सलग चौथ्या वर्षी रोबोटेक्स इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत विजयी परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि STEM शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

विशेष म्हणजे, गतवर्षीही समता फाऊंडेशनच्या संघाने एस्टोनियाची राजधानी टॅलिन येथे आयोजित रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून संस्थेचे आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले होते. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर समता फाऊंडेशनच्या संघाला दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या रोबोटेक्स इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ही बाब संस्थेसाठी तसेच रिसोड शहरासाठी अत्यंत अभिमानाची असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची आणि संस्थेच्या उत्कृष्ट प्रशिक्षणाची साक्ष देते.

समता फाऊंडेशनचे (Samata Foundation) पदाधिकारी, प्रशिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रसन्न निशांत बगडियाचे अभिनंदन केले असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे रिसोड शहराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स क्षेत्रात अधिक भक्कम होत आहे.