Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

नवेगाव महावितरण

महावितरणच्या दुर्लक्षामुळे निकतवाडा, नवेगाववासीयांचे हाल; कमी विद्युत दाबाने नागरिक त्रस्त

Navegaon Mahavitaran: निकतवाडा, नवेगावमध्ये महावितरणच्या दुर्लक्षामुळे कमी विद्युत दाब आणि अस्थिर वीज पुरवठा कारणीभूत असून गावातील नागरिकांना मोठा त्रास


महावितरणच्या दुर्लक्षामुळे निकतवाडा नवेगाववासीयांचे हाल कमी विद्युत दाबाने नागरिक त्रस्त

Navegaon Mahavitaran |

 

तात्काळ समस्यामार्गी लावण्याची सरपंच रूपाली दूधबावरे यांची मागणी...

घोट (Navegaon Mahavitaran) : चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत घोट अंतर्गत येणाऱ्या निकतवाडा व नवेगाव परिसरात महावितरणच्या दुर्लक्षामुळे कमी विद्युतदाब व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका नागरिकांना बसत आहे.तीव्र उन्हाळ्यात विजेअभावी चिमुकले,ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहे.परिसरात कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने पंखे,पाण्याच्या मोटारी व इतर घरगुती उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे.

अनेकदा रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्यात त्रास सहन करावा लागत आहे.गावातील वाढती लोकसंख्या व नवीन वीज कनेक्शनमुळे विद्यमान ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असून (Navegaon Mahavitaran) महावितरणकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.मेन स्विच जळणे व विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे यांनी (Navegaon Mahavitaran) महावितरणच्या घोट कार्यालयाकडे निवेदन सादर करून संबंधित गावांमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच थ्री फेज वीज व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.उन्हाळ्याच्या दाहकतेत नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन महावितरणने तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे व निकतवाडा,नवेगाव परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.