Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा

RTO Hingoli

हिंगोलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सतीश जाधव रुजू; पदभार स्वीकारला

हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अखेर कायमस्वरूपी अधिकारी मिळाला असून शासनाच्या पदोन्नती आदेशानुसार सतीश मरगु जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) म्हणून पदभार स्वीकारला आहे.


हिंगोलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सतीश जाधव रुजू पदभार स्वीकारला

RTO Hingoli |

हिंगोली (RTO Hingoli) : हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अखेर कायमस्वरूपी अधिकारी मिळाला असून शासनाच्या पदोन्नती आदेशानुसार सतीश मरगु जाधव यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

यापूर्वी हिंगोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल श्रीरंग गावडे यांची बारामती येथे बदली झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तेव्हापासून हिंगोली येथे कायमस्वरूपी अधिकाऱ्याच्या नियुक्तीची प्रतीक्षा होती.

दरम्यान, १९ जून रोजी शासनाच्या गृह विभागाने पदोन्नतीवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. या आदेशानुसार भंडारा येथे कार्यरत असलेले सतीश मरगु जाधव यांची हिंगोलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली.

नियुक्तीनंतर सतीश जाधव यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द करून पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत व सत्कार केला.

Related to this topic: