Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

Rohini Paradhye

रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे.


रील स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण २५ दिवसांनी पती निलेश पाराध्येविरुद्ध गुन्हा दाखल

Rohini Paradhye |

वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई; मानसिक व शारीरिक छळाचा आरोप, मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू

सोलापूर (Rohini Paradhye) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. आत्महत्येनंतर तब्बल २५ दिवसांनी पोलिसांनी तिचा पती निलेश पाराध्ये याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. यापूर्वी वैयक्तिक तणाव आणि कौटुंबिक वादामुळे रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा होती. मात्र, नव्या तक्रारीनंतर तपासाची दिशा बदलली आहे.

२५ वर्षीय विवाहित रोहिणी पाराध्ये हिने मंगळवेढ्यातील 'हॉटेल ग्रामपंचायत' येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे, याच हॉटेलमध्ये रील्स तयार करून तिने सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स मिळवले होते. तिच्या मृत्यूनंतर आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला होता.

या प्रकरणात पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासासह इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली. मात्र, सुरुवातीच्या तपासात आत्महत्येमागील ठोस कारण स्पष्ट झाले नव्हते. आता रोहिणीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी निलेश पाराध्ये याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, निलेश हा रोहिणीला तिच्या इच्छेविरुद्ध हॉटेलमध्ये काम करण्यास भाग पाडत होता. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सततच्या त्रासामुळेच रोहिणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

दरम्यान, रोहिणीच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही माहिती समोर आली आहे. निलेश पाराध्येशी विवाह करण्यापूर्वी रोहिणीचे एक लग्न झाले होते. पहिल्या विवाहातून विभक्त झाल्यानंतर तिची निलेशशी ओळख झाली आणि दोघांनी प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघे मिळून हॉटेल व्यवसाय सांभाळत होते.

मात्र, 'हॉटेल ग्रामपंचायत'च्या आणखी दोन शाखा सुरू झाल्यानंतर कामाचा ताण वाढला आणि त्यातून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. तरीही रोहिणीच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: