Breaking News
  • तुकाराम मुंढे नांदेडला आल्याची अफवा, भीतीपोटी पान टपऱ्या बंद करून , टपरी चालक पसार
  • तुळजापुरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात नागरिकांचे साखळी उपोषण; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
  • वाशिम शहरात आनंदाचे वातावरण... प्रचंड उकाड्यापासून वाशिमकरांना काहीसा दिलासा
  • अमरावती शहरात सलग तीसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी
  • आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद होणार असल्याच्या चर्चेमुळे चिंता वाढली
  • पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी न्यायालय 20 तारखेला देणार निकाल
  • नंदूरबारमध्ये सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याने मारली विहिरीत उडी
  • आय टी पार्क हिंजवडीत मद्यधुंद तरुणांच्या आलीशान कारने दुचाकीला उडवले
  • सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय आणि निर्धारित नियमांचे उल्लंघन करून नालेसफाईच्या कामावर तैनात केले जात असल्याची तक्रार दाखल झाल्याची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड हत्या घटना

रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर जुन्या वादाच्या कारणावरून खून

Risod murder Case: १५ जून रोजी रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर भगवान सुभाष गायकवाड हा मृतक असून त्याला डोक्यावर जबरदस्ती करून हत्या करण्यात आली.


रिसोड शहरातील हिंगोलीच्या मार्गावर जुन्या वादाच्या कारणावरून खून

Risod murder Case |

रिसोड (Risod murder Case) : संध्याकाळी आईला तलवारीने वार करून जखमी केल्यानंतर रस्त्यावरील नालीच्या ढाप्यावर गाढ झोपेत असलेल्या मुलाचा जुन्या वादाच्या कारणावरून दगड किंवा लोखंडी रॉडने डोक्यावर जबर वार करून खून केल्याची खळबळ जनक घटना दिनांक 15 जून रोजी रात्री 12 :30  वाजता च्या दरम्यान रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील पाण्याच्या टाकी समोर माणुसकी नगर येथे घडली. या (Risod murder Case) घटनेने रिसोड शहरात एकच खळबळ उडाली.भगवान सुभाष गायकवाड वय 38 वर्ष राहणार माणुसकी नगर रिसोड असे मृतकाचे नाव असून रिसोड पोलिसांनी सौ बाली बळीराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून 8 जणांविरोधात हत्या व विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य बघता पोलीस उपविभागीय अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत (Risod murder Case) पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ बाली बळीराम गायकवाड यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या शेजारी राहणारे प्रमोद संजय अंभोरे व इतर सात जन हे त्यांचे परिवारात सोबत नेहमी काही ना काही कारणावरून वाद घालायचे. यातच दिनांक 15 जून रोजी संध्याकाळी सात वाजता प्रमोद संजय अंभोरे, दीपक संजय अंभोरे,गजानन सुरेश बाजड, मनीषा प्रमोद अंभोरे, सीता संजय अंभोरे, शितल खंडू मानवतकर, आदित्य खंडू मानवतकर,संजय रामदास अंभोरे यांनी त्यांचे दीर नामे अनिल सुभाष गायकवाड यांचे सोबत फोनवर जोरजोराने बोलत असल्याच्या कारणावरून लाथाबुक्या लाठीकाठी ने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

सदर भांडण सुरू असताना त्यांची सासू नामे विमल सुभाष गायकवाड व अन्य भांडण सोडायला गेलं असता विमल सुभाष गायकवाड यांचे भर तलवारीने पायावर मारून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात तर पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले. (Risod murder Case) मात्र जखमीची प्रकृती बघता त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले. परिवारातील अन्य सदस्य जखमी सोबत दवाखान्यात असल्याने सदर प्रकरणी फिर्याद दाखल केली गेली नसल्याने सर्वजण घरी आले व रात्री जेवण करून सर्व झोपी गेले. यात भगवान सुभाष गायकवाड हे घरासमोर रस्त्यावर असलेल्या नालीच्या ढाप्यावर आपले अंथरून घेऊन झोपले असता रात्री  12:30 वाजताच्या दरम्यान शेजारील एका व्यक्तीने घरी येऊन भगवान सुभाष गायकवाड यांच्यावर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यावर गंभीरवार वार केले असल्याची माहिती दिली.

तातडीने सर्वजण बाहेर येऊन पाहणी केली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे आढळून आले. सदर घटनेची माहिती रिसोड पोलिसांना देण्यात आली. जुने भांडणाचे  कारणाचा राग मनात धरून भगवान सुभाष गायकवाड यांची प्रमोद संजय अंभोरे व अन्य सात जणांनी हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रिसोड पोलिसांनी याप्रकरणी कलम 103 (1)189 (2) 190 191 (2) 191 (3)118 115 (2) 352 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ही (Risod murder Case) घटना उघडकीस आल्यानंतर रिसोड पोलिसांना याबाबतची सूचना मिळाली असता ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आपले कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, पोलीस उपनिरीक्षक वसंत तहकीक,पो हे का मंगेश मालवे, महादेव चव्हाण, प्रशांत राजगुरू,पो का अमोल हाके,कय्युम पठाण,प्रवीण गोपनारायण, विश्वास चव्हाण, रवी इरतकर,विनोद घनवट, कांचन डोंगरे, आशिष पाठक यांचे सह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती सकाळी रिसोड शहरात वाऱ्यासारखी पसरतात घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक लॅब व श्वान नपथक पाचारण करण्यात आले होते. पुढील कारवाई रिसोड पुलिस करत आहे. सदर प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.