Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रेडिमेड कपड्याची चोरी

रिसोड शहरातील एका कापड दुकानातून रेडिमेड कपड्याची चोरी

Risod clothes Theft: रिसोड शहरातील सिविल लाइन भागात असलेल्या एका कापड दुकानातून पन्नास ते साठ हजार रुपयांचे रेडिमेड कापडा ची चोरी झाल्याची घटना दिनांक 23 जुलै रोजी सकाळी उघडकीस


रिसोड शहरातील एका कापड दुकानातून रेडिमेड कपड्याची चोरी

Risod clothes Theft |

रिसोड (Risod clothes Theft ) : रिसोड शहरातील सिविल लाइन भागात असलेल्या एका कापड दुकानातून पन्नास ते साठ हजार रुपयांचे रेडिमेड कापडा ची चोरी झाल्याची घटना दिनांक 23 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. सदर अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये चेहरा कापडाने झाकलेला दिसत असून मात्र चोरट्याने आधी सीसीटीव्ही कॅमेरा वर केला व नंतर चोरी केली आहे.

याबाबत दुकान मालक शेख यासीर यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या तक्रारींमध्ये म्हटले आहे की,त्यांचे सावील लाइनवर अलाहाबाद बैंकेच्या बाजुला रेडिमेड कापड दुकान असुन दिनांक 22 जुलै रोजी नियमित प्रमाणे त्यांनी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घरी गेले. दिनांक 23 जुलै रोजी सकाळी ते आपल्या दुकानावर दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना मागील बाजूचा शटर उघडा दिसला व त्या ठिकाणी ठेवलेले जीन्स पॅन्ट व इतर कपडे दिसून आले नाही.

सदर कापडाची किंमत 50 ते 60 हजार असल्याचे तक्रारीत शेख यासीर यांनी दिली असून वृत्तलेपर्यंत सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही मध्ये पाहणी केली असता चोरटा हा शटर उचलल्यानंतर आधी त्याने सीसीटीव्ही कॅमेरा वरती केला असल्याचे दिसून आले यानंतरच त्यांनी चोरी केली.