Breaking News
  • आजपासून संपूर्ण देशात ''VB-G RAM G'' कायदा लागू
  • १० वर्षांहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन; शासनाचा मोठा निर्णय
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये भडकला हिंसाचार; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू...
  • व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा संशयास्पद मृत्यू; पुनःशवविच्छेदनात २१ अवयव गायब असल्याचा दावा
  • RCB ची मालकी बदलली; 16,660 कोटींच्या व्यवहाराला CCI ची मंजुरी
  • दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! बस जळून खाक; 7 प्रवाशांचा मृत्यू, 22 जखमी
  • मुंबईसह ठाण्यात पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा; हवामान खात्याचा रेड अलर्ट
  • लोहगडावर चेतन चौधरीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन; सिया-चेतन ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत
  • शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; महापालिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचा संताप

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Revenue Department

चिखली तहसीलमधील प्रशासन बळकट करण्यासाठी आमदार श्वेता महाले यांचे प्रयत्न

चिखली तहसील कार्यालयातील रिक्त नायब तहसीलदार पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.


चिखली तहसीलमधील प्रशासन बळकट करण्यासाठी आमदार श्वेता महाले यांचे प्रयत्न

Revenue Department |

रिक्त नायब तहसीलदार पदे तातडीने भरण्याची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी

बुलढाणा (Revenue Department) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी चिखली तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार संवर्गातील रिक्त पदांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

चिखली तालुका हा बुलढाणा जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि महसुली कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका आहे. तालुक्यात ११ मंडळे आणि ६३ तलाठी सज्जा असलेल्या गावांचा समावेश असून विविध महसुली तसेच शासकीय सेवांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि शेतकरी तहसील कार्यालयात येत असतात.

सध्या तहसील कार्यालयातील मंजूर चार नायब तहसीलदार पदांपैकी दोन पदे रिक्त आहेत. त्यापैकी निवासी नायब तहसीलदार पद ३१ मे २०२६ पासून, तर एक नायब तहसीलदार पद ३० मे २०२५ पासून रिक्त आहे. त्यामुळे उर्वरित अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून महसुली आणि प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे आमदार महाले यांनी निवेदनात नमूद केले आहे.

याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याणाशी संबंधित प्रकरणे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे तहसील कार्यालयावरील कामकाजाचा भार आणखी वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी तसेच प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम राहावे, यासाठी चिखली तहसील कार्यालयातील रिक्त नायब तहसीलदार पदे तातडीने भरण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

Related to this topic: