Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

महसूल कर्मचारी आंदोलन

परभणीत पोलिस निरीक्षकांच्या बदलीच्या मागणीसाठी पाथरी महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन!

Revenue Department Employees Protest: पाथरी येथील पोलिस निरीक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बदली करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी आंदोलन


परभणीत पोलिस निरीक्षकांच्या बदलीच्या मागणीसाठी पाथरी महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

Revenue Department Employees Protest |

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप
तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व तलाठी आंदोलनात सहभागी..!

परभणी (Revenue Department Employees Protest) : पाथरी येथील पोलिस निरीक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बदली करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार २१ पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.तहसीलदार नितीन गर्जे यांनी ९ जुलै रोजी वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला होता. या प्रकरणात दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच कारवाईदरम्यान एका महसूल कर्मचाऱ्याला वाळू माफियांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती.

या (Revenue Department Employees Protest) प्रकरणात पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी नियमानुसार कार्यवाही केली नसल्याची तक्रार तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना पत्र देऊन पोलिस निरीक्षकांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने महसूल विभागातील अधिकारी , कर्मचारी व तलाठी यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

पाथरी येथील पोलिस निरीक्षकांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कामबंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकारी तालुक्यातून कार्यमुक्त होईपर्यंत आमचे कामबंद आंदोलन सुरू राहील.
-नितीन गर्जे, तहसीलदार पाथरी