Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणासाठी घेतले मातीचे नमुने

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकरी, गोपालक आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.


ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणासाठी घेतले मातीचे नमुने

RAWE Program |

पातूर (RAWE Program) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शेतकरी, गोपालक आणि नागरिकांसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. याच अनुषंगाने पातूर तालुक्यातील आस्टूल येथे श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला येथील कृषी विद्यार्थ्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम’ (RAWE) अंतर्गत मृदा परीक्षणासंदर्भात विशेष प्रात्यक्षिक आयोजित केले.

या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना माती परीक्षणासाठी योग्य पद्धतीने मातीचा नमुना कसा घ्यावा, याची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन मातीचे नमुने संकलित करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

मृदा परीक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले

कार्यक्रमात कृषी विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षणाचे शेतीमधील महत्त्व आणि त्यातून मिळणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा करणे आणि उत्पादनवाढ साधणे यासाठी मृदा परीक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक ठरले आकर्षण

या प्रात्यक्षिकामध्ये कृषीदूत राम येवनकार, राहुल निखाडे, हर्षल चके, सोहम धुरदर आणि संजय भराडी यांनी सहभाग घेत गावकऱ्यांसमोर मातीचे नमुने अचूक पद्धतीने कसे घ्यावेत, याचे सादरीकरण केले.

मान्यवरांचे मार्गदर्शन

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य राम खराडे सर, कार्यानुभव समन्वयक पांडुरंग जाधव सर तसेच विषय विशेषज्ञ हर्षल पोरे मॅम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे आस्टूल येथील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मृदा परीक्षणाबाबत जनजागृती झाली असून, गावकऱ्यांनी कृषी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Related to this topic: