Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

संतोष परीहार

मित्र पक्षांशी समन्वय ठेवून पुढे जाऊ: संतोष परीहार

Santosh Parihar: राष्ट्रवादी काँग्रेसने चिखली तालुक्यात बैठक आयोजित केली. तालुक्यात विकास आणि लोकहितासाठी मित्र पक्षांशी समन्वय करण्याची आवश्यकता मांडली गेली.


मित्र पक्षांशी समन्वय ठेवून पुढे जाऊ संतोष परीहार

Santosh Parihar |

चिखली (Santosh Parihar) : राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) यांनी मोठी मेहनत घेतली असून आगामी काळात मित्र पक्षांशी समन्वय ठेवून लोकहिताची कामे पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष परीहार यांनी केले. स्थानिक स्वरांजली हॉटेल येथे शुक्रवारी (दि.२२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीचे आयोजन तालुकाध्यक्ष संतोष परीहार (Santosh Parihar) यांनी केले होते. बैठकीत पक्ष संघटन मजबूत करणे, बूथ प्रतिनिधी नियुक्ती, शाखा विस्तार तसेच आगामी राजकीय भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष मनोज दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष विजय अंभोरे, राष्ट्रवादी नेते दत्ताभाऊ खरात, युवा नेते शेखर बोंद्रे, रुपेश रिंढे ,रुपेश गवई,, उमेश राठोड, सुनील सुरडकर, विलास वसु, राजेंद्र सुरडकर, प्रशांत जिने, विशाल थुट्टे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत मित्र पक्षांशी समन्वय साधून तालुक्यात विकासाभिमुख व लोकहिताची कामे करण्यासाठी लवकरच तालुकास्तरीय मेळावा घेण्याची भूमिकाही मांडण्यात आली. कार्यकर्त्यांनीही पक्ष संघटन वाढीसाठी गावपातळीवर सक्रिय होण्याचा निर्धार व्यक्त केला.

चिखली व बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सत्तेतील दोन मित्र पक्षांमध्ये राजकीय स्पर्धा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका बैठकीत संतोष परीहार (Santosh Parihar) यांनी मांडलेली “मित्र पक्षांशी समन्वय ठेवून पुढे जाण्याची” भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. संघर्षाऐवजी समन्वय आणि विकासाचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात सकारात्मक राजकीय संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Related to this topic: