Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासदार रामराव वडकुते

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

MP Ramrao Vadkute: संसदीनि समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्त राखलेल्या रामराव वडकुटे यांना विमानवाहतूक मंत्रालयाच्या धोरणात थेट भूमिका आहे. त्यांचा नियुक्ति केंद्रीय मंत्रिमंडळ


राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर नियुक्ती

MP Ramrao Vadkute |

हिंगोली (MP Ramrao Vadkute) : केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाने राज्यसभा सदस्य श्री रामराव सखाराम वडकुते यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. 29 जून 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव मुकेश कुमार यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे वडकुते (MP Ramrao Vadkute) यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या धोरण निर्मिती आणि कामकाजात थेट सहभाग घेता येणार आहे.

या अधिसूचनेनुसार एकूण पाच राज्यसभा सदस्यांची विविध मंत्रालयांच्या सल्लागार समित्यांवर वर्णी लागली आहे. यामध्ये श्री प्रमोद बोरो (गृह मंत्रालय), श्री बिस्वजित सिन्हा (ऊर्जा मंत्रालय), डॉ. संत्रुप्त मिश्रा (परराष्ट्र मंत्रालय) आणि श्री एल. के. सुधीश (कायदा व न्याय मंत्रालय - स्थायी विशेष निमंत्रित) यांचा समावेश आहे. सल्लागार समित्यांमुळे खासदारांना संबंधित मंत्रालयाच्या योजनांवर चर्चा करण्याची आणि सूचना मांडण्याची संधी मिळते. रामराव वडकुते यांच्या नियुक्तीमुळे विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना संसदेत अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.