Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > आपले शहर

राष्ट्रवादीच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाच्या पदरी पडणार, याबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


राष्ट्रवादीच्या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता

Rajya Sabha Election |

मुंबई (Rajya Sabha Election) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाच्या पदरी पडणार, याबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून, त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी सुरुवातीपासूनच छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. मात्र, अलीकडील काही दिवसांत भाजप नेत्या नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा रंगू लागल्याने या निवडीबाबत उत्सुकता वाढली होती.

या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईत झालेल्या राजकीय बैठका विशेष चर्चेचा विषय ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते थेट छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने त्यांच्या उमेदवारीच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्याचवेळी राज्यातील राजकीय समीकरणांचाही विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भुजबळ यांच्या संभाव्य दिल्लीतील भूमिकेनंतर राज्य मंत्रिमंडळात समीर भुजबळ यांना संधी देण्याचाही पर्याय चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रात छगन भुजबळ आणि राज्यात समीर भुजबळ अशी राजकीय मांडणी करण्याबाबत महायुतीतील वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीबरोबरच संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुतीच्या वतीने अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी आज दिवसभरात किंवा उशिरापर्यंत यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

Related to this topic: