Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > पुणे

गॅस स्फोटात तिघांचा मृत्यू; सुनेसह नातीचा थरारक बचाव

खाराडीतील खांदवेनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एलपीजी सिलिंडर स्फोटाच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला.


गॅस स्फोटात तिघांचा मृत्यू सुनेसह नातीचा थरारक बचाव

Pune LPG Cylinder Blast |

 

पुणे (Pune LPG Cylinder Blast) : खाराडीतील खांदवेनगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एलपीजी सिलिंडर स्फोटाच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला. घरातील दैनंदिन कामे सुरू असतानाच झालेल्या स्फोटात गित्ते कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर घरातील सून आणि सहा वर्षांची नात थोडक्यात बचावल्या.

शुक्रवारी सकाळी सुमारे सव्वानऊच्या सुमारास गित्ते कुटुंबीय घरातील कामांमध्ये व्यस्त होते. त्याच वेळी स्वयंपाकघरात नवीन गॅस सिलिंडर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक गॅसगळती होऊन मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील ज्येष्ठ सदस्य विष्णू गित्ते, त्यांची पत्नी वृंदाविनी गित्ते आणि मुलगा पांडुरंग गित्ते गंभीररीत्या भाजले. उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

लॉकडाऊननंतर उभारलेले संसाराचे घर उद्ध्वस्त

लॉकडाऊनच्या काळानंतर गित्ते कुटुंबाने खांदवेनगर येथे जागा घेऊन स्वतःचे घर उभारले होते. विष्णू गित्ते यांनी खासगी कंपनीत चालक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते पत्नी, मुलगा, सून आणि नातीसह येथे वास्तव्यास होते. पाच सदस्यांचे हे कुटुंब आनंदाने जीवन जगत होते; मात्र एका क्षणात काळाने त्यांच्यावर घाला घातला.

बाथरूममध्ये असल्याने सून बचावली

दुर्घटनेच्या वेळी राजश्री गित्ते या स्नानासाठी बाथरूममध्ये गेल्या होत्या. त्यामुळे स्फोटाचा थेट फटका त्यांना बसला नाही. त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांचा जीव वाचला. मात्र स्फोटानंतर निर्माण झालेल्या आगीमध्ये बाथरूम आणि स्वच्छतागृहातील साहित्याचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, सहा वर्षांची निहारिका घरातील हॉलमध्ये बसून दूरदर्शन पाहत होती. काही क्षणांतच स्वयंपाकघरातील आग इतर भागात पसरू लागल्याने ती घाबरून मदतीसाठी ओरडू लागली.

शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला

निहारिकाचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घरातून बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारण्यास सांगितले. प्रसंगावधान राखत निहारिकाने धाडसाने उडी घेतली. खाली उभ्या असलेल्या नागरिकांनी तिला सुरक्षित झेलल्याने मोठी दुर्घटना टळली.

आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या पांडुरंग यांचा दुर्दैवी अंत

पांडुरंग गित्ते हे आयटी क्षेत्रात कार्यरत होते आणि सध्या घरातूनच काम करत होते. स्फोटात ते मोठ्या प्रमाणात भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील तरुण सदस्याचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घर वाचवण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

या दुर्घटनेबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. गॅसगळती झाल्यानंतर सिलिंडर हाताळण्याचा किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तात्काळ घराबाहेर पडणे अधिक सुरक्षित ठरले असते, असे त्यांनी सांगितले. स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा घर वाचवण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना अधिक गंभीर ठरल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.