Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Public Disturbance

पाथरीत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या तिघांवर गुन्हा; शांतता भंग प्रकरणी पोलिसांची कारवाई

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पीपीएल मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाथरीत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या तिघांवर गुन्हा शांतता भंग प्रकरणी पोलिसांची कारवाई

Public Disturbance |

परभणी (Public Disturbance) : परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरालगतच्या पीपीएल मैदान परिसरात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवार (२५ जून) रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माधव नवले, बळीराम नवले (दोघे रा. फुलारवाडी, ता. पाथरी) तसेच बालाजी लांडे (रा. पाथरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (२५ जून) रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पीपीएल मैदान परिसरात संबंधित आरोपी सार्वजनिक ठिकाणी आपापसात भांडण व आरडाओरडा करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला.

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर काही काळ पाथरी पोलीस ठाणे परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रासवे करीत आहेत.

Related to this topic: