Political Appointment

शिवसेना चिखली तालुका उपप्रमुखपदी संदीप नरवाडे यांची नियुक्ती

शिवसेना चिखली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. सर्कल, चिखली तालुका) पदावर संदीप दत्तू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना चिखली तालुका उपप्रमुखपदी संदीप नरवाडे यांची नियुक्ती

Political Appointment

पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी; शिवसैनिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

चिखली (Political Appointment) : शिवसेना चिखली तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. सर्कल, चिखली तालुका) पदावर संदीप दत्तू नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना चिखली तालुकाप्रमुख गजानन शंकरराव मोरे यांनी नियुक्तीपत्र देत २० जून २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर केली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख संजय सोनवणे आणि जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप नरवाडे यांची शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख (सध्या जि. प. चिखली तालुका) पदावर एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी सक्रियपणे काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्याबरोबरच शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल शिवसैनिकांसह विविध स्तरांतून संदीप नरवाडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

संबंधित सामग्री

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावर संजय राऊत संतापले; शिंदे गटाला दोन शब्दांत सुनावलं 'बकवास लेकाचे'

शायना एनसी यांच्या कृतीवरून राजकीय वाद; संजय राऊतांचं दोन शब्दांत टीकास्त्र, तर मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची घोषणाबाजी.

Nov 18, 2026
सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्तेची मोहर! महेंद्र लाड अध्यक्ष, तानाजी पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड. गोपीचंद पडळकर यांच्या अनुपस्थितीची चर्चा.

Nov 18, 2026
‘बाळासाहेबांमुळेच वर्षा अन् सह्याद्रीवर वावरण्याची पत मिळाली’; शायना एनसींवर सुषमा अंधारेंचा घणाघात

‘बाळासाहेबांमुळेच वर्षा अन् सह्याद्रीवर वावरण्याची पत मिळाली’; शायना एनसींवर सुषमा अंधारेंचा घणाघात

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या आरोपावर सुषमा अंधारे संतप्त! शायना एनसींसह शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल.

Nov 18, 2026
सोनिया गांधींचे पुस्तक फाडल्याने सपकाळ संतप्त; म्हणाले ‘सूर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर पडते’

सोनिया गांधींचे पुस्तक फाडल्याने सपकाळ संतप्त; म्हणाले ‘सूर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर पडते’

सोनिया गांधींचे पुस्तक फाडल्याने हर्षवर्धन सपकाळ संतप्त! शिंदेसेनेवर टीका करत फडणवीसांच्या निर्णयांचे जीआर फाडण्याचे आव्हान.

Nov 18, 2026
शायना एनसींकडून मोठी चूक! सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडला

शायना एनसींकडून मोठी चूक! सोनिया गांधींच्या पुस्तकाची प्रत फाडताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटोही फाडला

शायना एनसी यांचा VIDEO व्हायरल! सोनिया गांधींच्या पुस्तकासोबत बाळासाहेबांचा फोटोही फाडल्याचा आरोप; ठाकरे गट आक्रमक.

Nov 18, 2026